Sunday, February 15, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 9, 2024
in top news
0
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नवे टर्मिनल येत्या रविवारपासून कार्यान्वित
0
SHARES
36
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पुणे, 9 जुलै (हिं.स.)। पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नवे टर्मिनल सेवा पुरवण्यास सज्ज होत असून सीआयएसएफच्या जवानांच्या पूर्ततेनंतर आता तांत्रिक प्रक्रियाही पूर्णत्वास जात आहे. नवे टर्मिनल सुरु झाल्यानंतर पुणेकर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. येत्या रविवारी म्हणजेच 14 जुलै रोजी हे नवे टर्मिनल सुरु होईल, अशी माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

याबाबत माहिती देताना केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले, पुण्यातील लोकनिर्वाचित खासदार तथा केंद्रीय मंत्री म्हणून दिवसभर आयोजित मॅरेथॉन बैठकांमध्ये मी पुणे शहर आणि परिसरातील विविध विकासकामांचा आढावा घेतला. यामध्ये पुणे महानगरपालिका, पीएमपीएमएल, पुणे मेट्रो, पुणे विमानतळ तसेच पुणे रेल्वे विभाग यांच्याशी संबंधित विविध कामांची माहिती घेण्यात आली. वरील सर्व विभागांमधील प्रगतीपथावरील सर्व कामे वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील नव्या टर्मिनलसंदर्भात बोलताना ते म्हणाले की नवे टर्मिनल सुरु करण्यासाठी सीआयएसएफच्या अतिरिक्त जवानांची आवश्यकता होती. यासाठी गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन यासाठी पाठपुरावा केला. त्यास तातडीने परवानगी मिळून सीआयएसएफचे जवान पुणे विमानतळावर दाखलही झाले आहेत. त्यानंतर पुढील तांत्रिक प्रक्रिया सुरु झाली आहे.

केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ पुढे म्हणाले, ‘नव्या टर्मिनलमध्ये इनलँड बॅगेज सिस्टिम बसवण्याची प्रक्रियाही पूर्ण झालेली असल्याने नवे टर्मिनल कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या 14 जुलैपासून नवे टर्मिनल पुणेकरांच्या सेवेत असणार आहे’
ते पुढे म्हणाले, आपल्या पुणे शहरासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या पीएमपीएमएलचे सक्षमीकरण करणे, हा आपला प्राधान्याचा विषय असून या संदर्भात पीएमपीचे अध्यक्ष डॉ. संजय कोलते आणि विविध विभाग प्रमुखांशी चर्चा केली. पुणे शहरात मेट्रो मार्गांचा विस्तार होत असला तरी पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांची लोकसंख्या लक्षात घेता आवश्यक बसेसची संख्या पूर्ण करणे अपेक्षित आहे. या अनुषंगाने एकूण 777 नवीन बसेस लवकरच नागरिकांच्या सेवेत दाखल होणार आहेत.

शहराचे पर्यावरण व सार्वजनिक वाहतूक यांचा समतोल साधण्यासाठी डिझेल बसेसचे रूपांतर CNG बसेसमध्ये करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. 226 डिझेल बसेस आता CNG बसेसमध्ये लवकरच रूपांतरित करण्यात येणार आहेत, तशी प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे.

पुणे मेट्रोच्या सद्यस्थिती आणि भविष्यातील योजनेबाबत बोलताना ते म्हणाले, पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण पंतप्रधान मा.श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या शुभहस्ते झाले. तेव्हापासून ते आजपर्यंतच्या प्रवाशांच्या आकडेवारीवरून मेट्रोच्या रुपाने पुणेकरांसाठी सक्षम वाहतूक व्यवस्था तयार होत आहे, हे स्पष्ट आहे. शहरातील काही भागात मेट्रो मार्गांचा विस्तार करण्यात येत आहे. त्यात स्वारगेट ते कात्रजदरम्याचा भूमिगत मार्गही असून केंद्र सरकारच्या मंजुरीनंतर त्वरीत त्याचे काम सुरू होईल. दुसऱ्या टप्प्यातील वनाज ते चांदणी चौक, एसएऩडीटी ते माणिकबाग, हडपसर-लोणीकाळभोर या मार्गांबद्दलही विचार सुरू आहे. याला मान्यता मिळाल्यावर त्याचे काम सुरू होईल.

यावेळी पुणे विमानतळावरील टर्मिनलपर्यंत मेट्रो नेणे आणि चांदणी चौक ते हिंजवडी या मार्गाबद्दल सर्व मुद्द्यांविषयी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे पुणे मेट्रो आणि फिडर बससेवेद्वारे अधिकाधिक नागरीकांना फायदा होण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंच मेट्रो कनेक्टीव्हिटी देण्यावर आपण भर दिला पाहिजे, अशी सूचना केंद्रीय मंत्री मोहोळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली.

Post Views: 11
Previous Post

बारामतीत १४ जुलैला राष्ट्रवादी काँग्रेसची अभूतपूर्व जाहीर सभा – सुनिल तटकरे

Next Post

हाथरस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
हाथरस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

हाथरस प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी

ताज्या बातम्या

लाईट दुरुस्तीच्या कामावर गेलेल्या मनपा कंत्राटी कामगाराला चौघांनी केली बेदम मारहाण. #public

February 14, 2026

विठ्ठलास आमंत्रण ने मिळवले यश.#viral #public #solapurnews #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला..#mumbai #viral

February 14, 2026

मेट्रो पुलाच्या खांबाचा भाग कोसळला.. #mumbai #viral #पब्लिक #public

February 14, 2026

भविष्यात तरी कलाकारांना सुयोग्य न्याय दिला जाईल का नागरिकांचा सवाल?#viral #public

February 14, 2026

मंठा लोणार रोडवर दोन हायवा वाहनांवर कारवाई.#viral #marathinews #public

February 14, 2026

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची कारवाई 15 लाख रुपयांची अफूची झाडे जप्त.#vairal #solapurnews #public

February 14, 2026

वसमत मध्ये उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस युनिट सुरू.#viral

February 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679887

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697