परतूर: केदार शर्मा
दरवर्षीप्रमाणे परतुर येथील व्यापारी मंडळाच्या वतीने आळंदी येथून पंढरपुराकडे प्रयाण केलेल्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी दिंडी मार्गावर अन्नछत्र थाटण्यात आले यात परतुर येथील व्यापाऱ्यांनी अन्नाची व चहा पाण्याची व्यवस्था केली होती या अन्नछत्रात भाजप युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष राहुल भैया लोणीकर यांनीही सेवादान केले यावेळी त्यांनी स्वतः स्वयंपाक सेवेत सहभाग घेतला शिवाय वारकऱ्यांना व्यापाऱ्यांसोबत स्टॉलवर उभे राहून अन्नदान केले त्यांच्या या कार्याने संपूर्ण परिसरात कौतुक करण्यात येत आहे या अन्नछत्राच्या संयोजनामध्ये परतुर येथील दिनेश सेठ होलानी, गोविंद तापडिया,संजय भापकर,गोविंद मोर, सत्यनारायण अग्रवाल, नेमीचंद कोटेचा, राजेंद्र दरगड, सौरभ बगडिया, संतोष काबरा, दत्तात्रय तनपुरे, संतोष कदम, दीपक अग्रवाल,आदी व्यापारी बांधव उपस्थित होते.
पाऊले चालती पंढरीची वाट !
श्री श्रेत्र आळंदी येथील कैवल्य साम्राज्य चक्रवती संतश्रेष्ठ श्री.ज्ञानेश्वर माऊली यांच्या पंढरपूर कडे विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी निघालेल्या आषाढी पालखी रथास नमन करून आलेल्या वारकर्यांच्या सोबत विठ्ठल रुक्मिणीच्या नामस्मरणात दंग झाले. शिवाय त्यांच्या सोबत फराळ करून जमिनीवरील कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट केले.