उरण तालुक्यातील चिर्ले गावचे भूमिपुत्र आणि रायगड जिल्ह्याचे भाजपचे उपाध्यक्ष निळकंठ घरत यांचे शुक्रवारी निधन झाले. शोभीवंत फुग्यामध्ये हवा भरत असताना त्याचा स्फोट होऊन घरत जखमी झाले होते. त्यांच्यावर ऐरोली येथील बर्न रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. नीलकंठ घरत हे फुग्यांमध्ये हवा भरत असताना झालेला हा प्रकार त्यांच्या जीवावर बेतले.
शिवडी न्हावा -शेवा अटल सेतूचे उद्घाटन प्रसंगी सेतूवर लावलेले शोभीवंत फुग्यापैकी काही फुगे नीलकंठ घरत यांनी दुसऱ्या दिवशी चिरले येथील आपल्या घरी आणून घराबाहेर लावले होते . १५ जानेवारीला फुग्यातील हवा कमी झाल्यामुळे त्यात हवा भरत असताना प्रचंड स्फोट होवून नीलकंठ घरत हे ६० ते ७० टक्के भाजले होते. त्यानंतर घरत यांना तातडीने ऐरोली येथील बर्न इस्पितळात दाखल करण्यात आले. रुग्णालयात उपचार सुरू असतानाच शुक्रवारी रात्री त्यांचे निधन झाले.