भोकरदन- जाफ्राबाद विधान मतदारसंघाच्या यादीमध्ये अवैध रित्या नावे समाविष्ट करणे थांबवावेत नसता काँग्रेस कडुन या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल राजाभाऊ देशमुख
भोकरदन : भोकरदन- जाफ्राबाद विधान सभेच्या मतदारयादीत बदनापूर मतदार संघातील मतदारांचे नावे अवैध रित्या काही पक्षाचे पदाधिकारी समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न करीत असल्याबद्दल अनेक नागरिकांनी माझ्याकडे तक्रार केली असून मी याबद्दल मा तहसीलदार भोकरदन येथे लेखी तक्रार केली असून यावर संबंधित विभागाने हे अवैध समाविष्ट नावे कमी केले नाही तर जालना जिल्हा काँग्रेस कमिटीकडुन तीव्र आंदोलन करण्यात येईल असे
राजाभाऊ देशमुख यांनी मा तहसीलदार यांना दिलेल्या लेखी तक्रारीत म्हणाले.
या पुर्वी भोकरदन शहरातील मतदान यादीत बदनापूर मतदार संघातील बोगस अवैध मतदारांचे नावे समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु आम्ही वेळेवर आक्षेप घेऊन योग्य तो पुरावा सादर केल्यामुळेच बरीचशी अवैध नावे त्यावेळी कमी करण्यात आम्हाला यश आले
आम्ही दिलेल्या तक्रारीची दखल निवडणूक विभागाने घेतली नाही तर जालना काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देशमुख यांनी मा तहसीलदार यांना दिलेल्या लेखी तक्रारीत दिला आहे