तभा फ्लॅश न्यूज/ बार्शी : आगामी सण-उत्सव व निवडणुका शांततेत व सुरळीत पार पडाव्यात, नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास निर्माण व्हावा आणि संभाव्य सामाजिक अस्थिरता, धार्मिक व जातीय संघर्ष उद्भवल्यास तत्काळ व प्रभावी कारवाई करता यावी, यासाठी रॅपिड ॲक्शन फोर्स (RAF) च्या बटालियनसह भव्य रुट मार्च गुरुवार रोजी सकाळी बार्शी शहरातील प्रमुख मार्गांवर काढण्यात आला.
सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर तसेच बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली हा रुट मार्च आयोजित करण्यात आला.
या रुट मार्चमध्ये रॅपिड ॲक्शन फोर्स, हकीमपेटा, सिकंदराबाद, तेलंगणा येथून आलेल्या सहाय्यक पोलीस अधीक्षक ए. सरस्वती, पोलीस निरीक्षक डी. एस. मस्कर, भगवंत पारीश यांच्यासह ३५ पोलीस अंमलदार तसेच बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर ढोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, बार्शी शहर पोलीस ठाण्याचे २५ पोलीस अंमलदार आणि सोलापूर ग्रामीण हेडक्वार्टरमधील रॉयल कंट्रोल पोलीस फोर्सचे अंमलदार सहभागी झाले होते.
Post Views: 12