मुदखेड ता प्र
नांदेड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लोकस्वराज्य आंदोलनांचे संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्रजी भरांडे सर यांनी गेल्या दहा दिवसांपासून समाजाच्या विविध मागण्यासाठी उपोषणाला बसले असुन सरकारच्या वतीने अजुनही दखल घेतली नसुन यांच्या केसालाही धक्का लागला तर आम्ही कायदा हातात घेऊन हजारो समाज बांधव महिला पुरुष युवक युवती रस्त्यावर उतरून आंदोलन तीव्र करणार.
तालुकाध्यक्ष पीजी केदारे यांचे बारड येथे रास्ता रोको आंदोलना दरम्यान आपल्या मनोगतात इशारा दिला आहे.
यावेळी माणिक कांबळे, अण्णाभाऊ साठे क्रांती आंदोलनाचे मराठवाडा अध्यक्ष पिराजी गाडेकर, धोंडोपंत बनसोडे, बाळासाहेब टिकेकर,
शिवराज केदारे, साईनाथ जळपतराव,मारोती वाघमारे,संभाजी एडके, पत्रकार मनोज मनपुरे साहेबराव जोंधळे,चांदराव पोतरे, द्रौपदाबाई कांबळे आदीसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.