अमरावती, 13 ऑगस्ट, (हिं.स.) आशीर्वाद दिला नाही, तर तुमच्या खात्यातून पेसे परत घेऊ, असं विधान केल्यानंतर टीकेच्या धनी बनलेल्या रवी राणा आता आपल्या विधानाची सावरासावर करताहेत. बहीण भावाच्या नात्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात मी गमतीने ते बोललो आणि सगळ्या महिला तेव्हा हसत होत्या, असं म्हणत रवी राणा यांनी आपल्या विधानाचं सारवासावर केली.
अमरावतीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं प्रमाणपत्र वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्याला आमदार रवी राणा यांनीही हजेरी लावली. याच सोहळ्यात त्यांनी लाडक्या बहिणींना दम दिला होता. आगामी विधानसभा निवडवणुकीत मतदानाचा आशाीर्वाद मिळाला नाहीतर तुमच्या खात्यातून १५०० रुपये काढून घेऊ असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं होतं.
त्यांच्या विधानानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली. टीकेचे धन बनताच त्यांनी आपल्या विधानाची सारवासावर केली. बहीण भावाच्या नात्यांमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात मी गमतीने ते बोललो आणि सगळ्या महिला तेव्हा हसत होत्या. बहीण भावाचं नातं हे गमतीच आपुलकीचं, प्रेमच, असलं पाहिजे, आणि त्या नात्यांमध्ये मी बोललो मात्र विरोधक त्याचा बाऊ करत आहे. त्यांच्या पायाखालची वाळू घसरल्याची टीका त्यांनी यावेळी केली. येणाऱ्या काळामध्ये सरकार आल्यावर १५०० रुपयाचा हप्ता ३००० रुपये महिना करण्याची मागाणी सुद्धा मी केलीय. आशा वर्कर मदतनिसचा पगार वाढावा ही सुद्धा मी मागणी केली आहे.