भंडारा जिल्ह्यात रेड अलर्ट जारी
भंडारा, 22 जुलै (हिं.स.)। भंडारा जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून पाऊस सुरू असून रस्ते आणि सखल भागात साचले आहे. नागरिकांच्या घरात सुद्धा पाणी शिरले आहे.
याच दरम्यान हवामान खात्याने भंडारा जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर केले असून खबरदारीचे उपाय म्हणून जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.