शेतकऱ्याचे खाते होल्ड काढा – खंदारे
तळणी, (प्रतिनीधी ) : मंठा तालुक्यातील तळणी महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखेने शेतकऱ्यांची बचत खात्याचे अकाऊंट होल्ड ( गोठवले ) आहेत. अनेक शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून पीक कर्ज घेतले आहेत.पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड केले आहेत. त्यामुळे कामासाठी रक्कम काढण्यासाठी गेलेले शेतकरी रिकाम्या हाताने परतत आहेत.त्यामुळे शेतकऱ्यांना ऐन आर्थीक खरीप हंगामात अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नुकतेच पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे. या शिवाय दुष्काळी अनुदानासह अतिवृष्टी अनुदानही बँकेत जमा झाले आहे.
तसेच खरीप व रब्बी पीक विमा योजना अंतःर्गत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला आहे. स्प्रिंकलर ठिबक सिंचन योजनेच अनुदान बचत खात्यात जमा झाले आहे .या शिवाय अनेक शेतकऱ्यांनी पेरणी साठी बँकेत रक्कम जमा ठेवली होती. पेरणी साठी व दैनंदिन व्यवहारासाठी राखुन ठेवलेली रक्कम बँकेने गोठवल्या मुळे शेतकरी रिकाम्या हाताने जात आहेत. ऐन खरीप हंगामात खात्याचे होल्ड काढावेत अशी मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.
सामाजिक कार्य कर्ते किशोर खंदारे महाराष्ट्र ग्रामीण शाखाधिकारी पीक कर्जदाराचे ऐन पेरणी काळात खाते होल्ड करणे अत्यंत चुकीचे आहे. बँकेने कोणतीही अट न घालता तात्काळ होल्ड केलेले खाते खुले करावेत. तसेच क्रॉप लोन वसुलीची सक्ती करु नये. तसेच अनुदान रक्कम कपात करू नये.
*महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखाधिकरी जे थकीत कर्जदार ( एन पी ए ) आहेत. त्यांचे खाते होल्ड केले आहेत. त्या सोबत जे नियमीत कर्ज दार आहेत . त्यांचे खाते चुकीने झाले आहेत. जे शेतकरी बँकेत येवुन सांगतील आमच्या खात्याचे होल्ड काढा त्या शेतकऱ्यांचे होल्ड आम्ही लगेच काढीत आहोत. कर्ज वसुलीची कोणावरही सक्ती नाही. भाग्यश्री केडिया शाखा अधिकारी महाराष्ट्र ग्रामीण बँक तळणी*