लोहा येथे शिवसेनेचे खा. संजय राऊत यांच्या जाहीर सभेची राजकीय वर्तुळात चर्चा
—————————————
लोहा
शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची खा.संजय राऊत यांची १२ संप्टेबंर २०२४ रोजी भावी आमदार एकनाथ दादा पवार यांचे आगामी विधानसभा निवडणुक मध्यवर्ती कार्यालयाचे लोकार्पण व राधीका मंगल कार्यालयात जाहीर सभेचे आयोजन केले आहे.खा संजय राऊत यांच्या होणाऱ्या आगमनाने राजकीय वर्तुळात चर्चा
लोहा -कंधार मतदार संघात शिवसेना उबाठा पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा लोहा -कंधार मतदार संघाचे शिवसेना महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून संबोधले जाणारे एकनाथ दादा पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती सांगितली.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांची .१२ सप्टेंबर रोजी राधाई मंगल कार्यालय येथे सकाळी १० वाजता ” शिव संवाद मेळाव्याला प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत यावेळी शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आ.आंबादास दानवे, नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात आदी उपस्थित राहणार आहेत.
शिवसेना नेते खा. संजय राऊत यांच्या सभेसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने जय्यत तयारी केली असुन यासाठी विविध समित्या स्थापन केल्या आहेत.
शिवसेना नेते संजय राऊत यांची पहिल्यांदाच लोहा शहरात जाहीर सभा होणार असल्यामुळे संजय राऊत काय बाम्ब गोळा टाकतील की भावी उमेदवार एकनाथ दादा पवारच असतील अशा गौप्यस्फोट करुन अन्ये भावी उमेदवाराला आहावान आसेल यांची आतुरता राजकीय वर्तुळात ऐकायला मिळत आहे.
शिवसेनेचे एकनाथ दादा पवार यांच्या मध्यवर्ती निवडणूक कार्यालयांचे उद्घाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत व शिवसेनेचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या मान्यवरांच्या हस्ते होणार लोकार्पण होणार आहे.
या पञकार परिषदेला विधानसभा प्रमुख भाऊसाहेब पाटील कदम, विक्रम कदम, लोहा तालुकाप्रमुख संजय ढाले, शिवसेनेचे लोहा शहरप्रमुख खंडू पाटील पवार, कंधार तालुकाप्रमुख सचिन पेटकर, युवासेनेचे गजानन पाटील मोरे, सरपंच रामेश्वर पाटील पवार, रुद्रा पाटील भोस्कर, आदी उपस्थित होते.