अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
सीडबॉल संदर्भात श्री देवानंद चित्राल सर यांनी सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने एक वृक्ष आई साठी ब्रीद वाक्य लावून विद्यार्थ्यांना भावनात्मकरीत्या श्रमदान करिता प्रेरीत केले. सीडबॉल रोपणाचे प्रशिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांनी उत्साहाने सीडबॉल चे रोपण करून निसर्गाचा आनंद लुटला.
अंबड सामाजिक वनीकरणचे अधिकारी यांच्या सह सावित्रीबाई फुले माध्यमिकव व उ. मा.विद्यालय बोधलापुरी शाळेचे श्री मनोहर पटेकर, सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय अंबड चे शिक्षक श्री वाल्मिक निंबाळकर सर,विद्यार्थी आणि अंबडचे नगरीचे सामाजिक कार्यकर्ते तथा गटसाधन केंद्र पंचायत समिती घनसावंगी चे साधन व्यक्ती श्री देवानंद चित्राल सर यांनी परिश्रम घेतले.