नातेपुते पोलिस स्टेशन हद्दीत चोरीला गेलेले २,९०,४९० रुपयांचे १२ मोबाईल हस्तगत करुन मूळ मालकांना परत केले. सहायक पोलिस निरीक्षक महारुद्र परजणे आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
काही दिवसांपूर्वी मोबाईल चोरिला गेल्याप्रकरणी नातेपुते पोलिस स्टेशनमध्ये मदनकुमार जोशी (रा. नातेपुते) यांनी फिर्याद दिली होती. याचा तपास करून आरोपी उमेश पोपट लोंढे (रा.बरड, ता. फलटण, जि. सातारा) यास ताब्यात घेत त्याच्याकडून चोरीचे १२ मोबाईल जप्त केले. यापूर्वी बाजारतळ, शहर, ग्रामीण भागातून मोबाईल चोरीच्या तक्रारी आल्या होत्या. सायबर सेलच्या मदतीने तपास करून उमेश लोंढे याला ताब्यात घेत त्याच्याकडून १२ मोबाईल जप्त केले. पोलिस निरीक्षक विकास दिंडोरे आणि त्यांच्या पथकाने सायबर सेलच्या मदतीने ही कामगिरी केली आहे