तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी
नालेवाडी येथील श्री. बाबासाहेब एकनाथ बटूळे रा. नालेवाडी ता. अंबड जि. जालना आपण ओ.बी.सी. समाजहितासाठी सतत क्रियाशील राहून त्यांच्या न्यायहक्कासाठी लढा देतात. या आपल्या कर्याची दखल घेत” राष्ट्रीय ओ.बी.सी. महासंघ मुख्यालय नागपूर ” या संपुर्ण भारतात ओ.बी.सी.साठी काम करणाऱ्या नामांकीत संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. डॉ.प्रा. बबनरावजी तायवाडे सर व राष्ट्रीय कार्यकार्णीचे आदेशांवरून मा.राज्य कार्यकारीर्णीने व मराठवाडा अध्यक्ष मा. दिपक जाधव सर यांच्या आदेशांवरून आपली ” जालना जिल्हा संघटक ” या पदावर सन्मानपुर्वक नियुक्ती करण्यात येत आहे.
आपण राष्ट्रीय ओ.बी.सी. महासंघाचे कार्य वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या जिल्ह्यात क्रियाशील राहून ओ.बी.सी. यांच्या हितासाठी कार्यरत रहाल यात शंका नाही. तसे नियुक्तीपत्र राष्ट्रीय ओबीसी महासंघ मराठवाडा उपाध्यक्ष बाळासाहेब दखणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे या कार्यक्रमास जालना जिल्हा कोळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रल्हादराव शिंदे स्वाभिमानी युवा शेतकरी संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष गणेश गावडे राष्ट्रीय ओबीसी महासंघ जालना जिल्हा सचिव ताराचंद पवार अण्णा मारुती शिंदे मनोहर बानाई अक्षय घुगे कल्याण वाघमारे गणेश बांगर राष्ट्रीय ओबीसी महासंघ शहागड सर्कल प्रमुख रामेश्वर वाघमारे पत्रकार बंधू व कार्यकर्ते मोठ्या संख्येनेउपस्थित होते