महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या उमरी तालुकाध्यक्ष पदी भारत सावळे गोरठेकर यांची निवड .
—————————–
उमरी ( प्रतिनिधी ) उमरी तालुक्यातील गोरठा येथिल भुमिपुत्र भारत नागोराव पाटील सावळे यांची महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या उमरी तालुकाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे .
महाराष्ट्र राज्य कुणबी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष गिरीष जाधव यांनी दि ७ जुलै २०२४ रोजी भारत पाटील सावळे गोरठेकर यांची महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघाच्या उमरी तालुकाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे घोषीत करून नियुक्ती पत्र देण्यात आले आहे .
भारत सावळे गोरठेकर हे गोरठेकर घराण्यातीलआमदार स्व .बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे जेष्ट चिरंजीव स्व . गिरीष गोरठेकर यांचे जीवलग मित्र आणि पि ए म्हणून ख्याती ओळख आहे भारत सावळे यांनी गोरठा ग्रामपंचायत चे उपसरपंच पद निष्कलंक रित्या पार पाडले आहे .
दै सामना वृतपत्राचे ते उमरी प्रतिनिधी म्हणून कार्य करीत सामाजीक कार्य करीत असतात अन्याय अत्याचार विरुध्द लेखणीतून अवाज उठवून अनेकांना न्याय मिळून दिला आहे त्यांच्या कार्याची सामाजीक चळवळीची वेळ , श्रम ‘ बुद्दी , कौशल्याची सेभाभावी भावनेने सातत्याने कार्य करीत आलात त्या सामाजिक कार्याचे मोलाचे योगदान लक्षात घेवून कार्याची दखल घेवून हेच कार्य पुढील व्यापक स्वरूपात करण्याची संधी म्हणून आपल्या हातून जनसेवा घडावी संघटनेला अधिक आधिक बळकट मिळावे म्हणून उमरी तालुका महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ संघटनेच्या अध्यक्षपदी भारत सावळे पा . गोरठेकर यांची निवड करण्यात आली आहे .
यावेळी उमरी तालुका महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा कार्यकारणी जाहीर करण्यात आले अध्यक्ष – भारत पा .सावळे गोरठेकर , उपाध्यक्ष – बालाजी डांगे कळगावकर , सचिव . देवानंद पा वडजे , कार्यध्यक्ष – गोरठेकर परमेश्वर पाटील , कोषध्यक्ष -गंगाप्रसाद पा गोमासे , सहसचिव – गोंविद पा कोल्हे , संघटक – काशीनाथ पा कोल्हे, मार्गदर्शक प्राध्यापक कदम पाटील एम एम , मार्गदर्शक बंबरे पंडितराव पाटील , मार्गदर्शक शंकर पाटील गोमासे आदीची निवड करण्यात आली आहे . त्यामुळे भारत सावळे गोरठेकर यांची अध्यपदी निवड झाल्या बदल व त्यांच्या सर्व संघटनचे सर्वच स्तरावरून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .