आई-वडिलांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा — प.पू. योगानंद महाराज…..
मंठा/ प्रतिनिधी : आई-वडिलांची सेवा केल्याने सर्व तीर्थाचे दर्शन घडते आणि मनाला समाधान लाभते. आई-वडिलांच्या सेवेतच खरी ईश्वर सेवा असल्याचा उपदेश प.पू. योगानंद महाराज यांनी केला. दहिफळ खंदारे येथील योगीधाम येथे गुरु पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उपदेश करताना परमपूज्य योगानंद महाराज यांनी सांगितले की, आजच्या युवकांनी व्यसनापासून दूर राहण्याची गरज आहे. व्यसनामुळे अनेक लोकांचे संसार उध्वस्त झाले
असून मुला बाळांच्या पालन पोषणाकडेही दुर्लक्ष होत असल्याची त्यांनी सांगितले. गुरु पौर्णिमेनिमित्त परमपूज्य योगानंद महाराज यांचे भाविकांनी भक्ती भावाने पूजन केले. व्यसनापासून दूर राहा आई-वडिलांची सेवा करा आपल्या मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार द्या असा उपदेश परमपूज्य महाराजांनी केला. यावेळी पंचक्रोशीतील भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.