नवीन नांदेड प्रतिनिधी
हडको येथील रहिवासी बीएसएफ मधील शहीद जवान कामेश विठ्ठलराव कदम यांचे कर्तव्यावर असताना हरियाणा गुडगाव येथे हृदयविकाराच्या झटक्याने दिनांक ९ जुलै रोजी त्यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिव देहावर ११ जुलै रोजी सकाळी १० वाजता सिडको येथील वैकुंठ धाम समशान भूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी हजारोच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता.
हडको येथील शहीद जवान कामेश कदम हे बीएसएफ मधील नाईट पदावर कर्तव्यावर असताना हरियाणा गुडगाव येथे रदयविकाराने त्यांचे दिनांक ९ जुलै रोजी दुःखद निधन झाले त्यांच्या पार्थिवावर दिनांक ११ जुलै रोजी सिडको येथील वैकुंठधा स्मशानभूमी येथे शासकीय इतनामात बीएसएफ जवानानी पाच रायफलीच्या फायरिंग करून सलामी देण्यात आली व तसेच नांदेड पोलीस दलाकडून सुद्धा पाच रायफलीच्या फायरिंग करून शहीद जवान कामेश कदम या सलामी देण्यात आली यावेळी बीएसएफ दलाचे अधिकारी शर्मा व नांदेड पोलीस दलाचे अधिकारी यांनी पुष्पचक्र वाहून आदरांजली अर्पण केली.
याचवेळी नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, तत्कालीन खासदार प्रतिनिधी रवींद्र चव्हाण, सुरेश दादा गायकवाड, वंचित चे फारुख अहमद, संजय पाटील घोगरे, दक्षिणचे आमदार प्रतिनिधी राहुल हंबर्डे, नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नागनाथ आयलाने यांच्यासह अनेक राजकीय व शासकीय अधिकारी कर्मचारी व उपस्थित राहून पुष्पचक्र वाहून शहीद जवान कामेस कदम यांना आदरांजली वाहिली यावेळी त्यांचे कुटुंबीय आई-वडील भाऊ पत्नी व मुलगा शोकाकुल अवस्थेत होते.