भोकर(प्रतिनिधी)काँग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणिस जिल्हा बँकेचे माजी विभागीय अधिकारी समर्थ बँकेचे संचालक सहकार क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व शामसूंदर पाटील लगळूदकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार गटामध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर असल्याचे सांगीतले.
लगळूद येथील शामसूंदर पाटील सहकार क्षेत्रात जिल्हा बँकेत विभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना सर्व शेतकरी बांधवाच्या समस्या सोडविले सामाजीक बांधीलकी म्हणून गोर गरीब व सर्व सामान्यांचे अनेक प्रश्न सोडविले त्यांना लगळूद च्या नागरीकांनी एक वेळा सरपंच पदाची संधी दिली तेंव्हा गावचा विकास साधण्याचा प्रयत्न शाम पाटील यांनी केला आहे.सध्या ज्या पक्षात कार्यरत होते तिथे त्यांची कोंडी होत असल्याने व माजी केद्रिय राज्यमंत्री सूर्यकांता पाटील यांचे अत्यंत विश्वासू म्हणून ओळखले जाणारे शामसूंदर पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदपवार गटात सामील होण्याच्या मार्गावर आहेत.
काँग्रेस पक्षाने त्यांना जिल्हा सरचिटणिस पदाची जबाबदारी देण्यात आली होती तेंव्हा त्यांचेवर टाकलेली जबाबदारी योग्य रितीने पार पाडण्यात आली मागील झालेल्या कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकि दरम्यान काँग्रेस प्रणित पॅनलच्या उमेदवारांचा गावागावात जावून प्रचार केला अटीतटीच्या लढतीमध्ये काँग्रेस प्रणित पॅनलचा दणदणित विजय झाला शाम पा.लगळूदकर तालूक्यात सर्वत्र परिचित आहेत उत्तम वक्ता सामान्यांच्या पाठिशी खंबिरपणे उभे राहून प्रसंगी मदत करतात पक्षामध्ये कोंडी निर्माण होत असल्यामूळे ते शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी मध्ये लवकरच प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत.