शिरड रस्ता बनला मृत्यूचा सापळा…….
निवघा बा. हदगाव तालुक्यातील निवघा बाजार येथून पाच किमी अंतरावर शिरड हे गाव आहे निवघा ते शिरड रस्त्यावर निवघा बाजार पासून दोन किमी अंतरावर कोहळी साप्ती जातो निवघा बाजार ते कोहळी फाटा हा रस्ता दोन महिन्यापूर्वी नवीन रस्ता झाला असून निवघा बाजारपासून कोहळी फाट्यापर्यंत या रस्त्यावरील खड्ड्यापासून नागरिका दिलासा मिळाला आहे शिरड रस्त्याची आता दयनीय अवस्था झाली असून रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहे
खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने वाहन चालवताना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची चाळण झालेली आहे या रस्त्यावरून शिरड ते मनूला बु माटाळा पुढे विदर्भात पळशी या गावांना जाण्यासाठी प्रमुख रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची दळणवळण असते रस्त्यावरील पडलेल्या मोठ्या खड्ड्यात पाणी साचत असल्याने अपघात होऊन जीवित हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही
सार्वजनिक बांधकाम उपविभाग हदगाव येथील वरिष्ठ अधिकारी यांनी याकडे लक्ष देऊन खड्ड्यामुळे मृत्यूचा सापळा बनलेल्या रस्त्यावरील खड्डे बुजून रस्ता दुरुस्ती करावा अशी मागणी या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या सर्व गावांमधून होत आहे अनेकांना कंबर दुखी पाठीचे दुखणे खड्डेमुळे तसेच उकडलेल्या रस्त्यामुळे अनेकांना पाठीचे दुखणे असे त्रास सुरू झाले आहेत कारण खड्ड्यातून वाहन नेताना चांगले हादरे बसतात त्यानंतर घरी येऊन थेट विश्रांतीच घ्यावी लागते. वेळप्रसंगी वेदनासह झाल्याने डॉक्टराकडे जावे लागते हा नसता त्रास आता संपायला हवा अन्यथा आम्हाला रस्त्या उतरावा लागेल असा इशारा नागरिकांनी दिला आहे…..