भोकर(प्रतिनिधी)नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला यश आले असून त्यात भोकर तालुक्याचा सिंहाचा वाटा आहे. तालुक्यातील निष्ठावंत काँग्रेस, राष्ट्रवादी(शरद पवार) शिवसेना(उध्दव ठाकरे)तिन्ही पक्षाचे सर्व कार्यकर्ते खा. वसंत चव्हाण यांना विजयी करण्यासाठी योग्य प्रचार यंत्रणा राबवून एकजूटिने परिश्रम घेतल्यामूळे यश पदरात पडले.
शिवसेनेने आघाडी धर्माचे पालन करुन उबाठा शिवसेनेचे माजी तालूका प्रमूख तथा कृषि उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सतीश देशमुख यांनी आपल्या निष्ठावंत शिवसैनिकांसह पायाला भिंगरी बांधल्या प्रमाणे तालुक्यातील प्रत्येक वाडी,तांड्यावर जावून प्रचार केला. आपली बाजु मतदारांसमोर भक्कम पणे मांडून महाविकास आघाडी च्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले.
सतीश देशमुख यांनी आजपर्यंत पक्षाने देईल ती जबाबदारी तन मन धनाने पार पाडली असुन आज पक्ष त्यांनी केलेल्या कामाची दखल घ्यावी व त्यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकित भोकर मतदार संघातून शिवसेने तर्फे उमेदवारी द्यावी.भोकर तालूक्यात पक्ष जिवंत ठेवण्याचे काम काही निष्ठावंत मावळे केले त्यात सतीश देशमुख यांचे नाव आघाडीवर आहे.
भोकर नगरपरिषदेची निवडणूक जिल्हापरिषद पंचायत समितीची निवडणूक तसेच मार्केट कमिटी खरेदी विक्री संघाची निवडणूक असेल प्रत्येक निवडणूकित आपल्या शिवसेनेच्या मावळ्यांना सोबत घेऊन किल्ला लढवत आलेले आहेत. म्हणूनच आज पक्षाने त्यांच्या उमेदवारीबाबत विचार करावा. अशी मागणी तालुक्यातील असंख्य शिवसैनिकांची आहे.