जेऊर – सोलापूर जिल्हा माध्यमिक शिक्षक व सेवक सहकारी पतसंस्था बाळे, सोलापूर यांच्या वतीने देण्यात येणारा सन 2025- 26 चा आदर्श शिक्षक पुरस्कार राजाभाऊ तळेकर विद्यालयातील शिक्षिका सौ शोभा महादेव लोंढे यांना प्रदान करण्यात आला. सदरचा पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दिनांक 18 जानेवारी रोजी पंढरपूर येथील सिंहगड संस्थेच्या प्रांगणामध्ये पार पडला.
सदर कार्यक्रमास मा. शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत सर आणि पतसंस्थेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
सौ. शोभा लोंढे यांनी मागील 35 वर्ष विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य केले आहे. त्यांनी घडवलेले अनेक विद्यार्थी उच्च पदावर कार्यरत आहेत. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे

















