दडपशाहीचे राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवा – सतीश घाटगे
कुरणमध्ये युवकांच्या शाखेचे जल्लोषात उद्घाटन : अनेकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
20 जूलै अंबड : भाजपा नेते सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली अंबड तालुक्यातील गावागावातील युवक प्रस्थापित राजकारण्याची दडपशाही मोडीत काढण्यासाठी आणि गावातील प्रश्न सोडविण्यासाठी भाजपात प्रवेश करत आहेत. शुक्रवारी कुरण गावात मोठ्या जल्लोषात आणि उत्साहाच्या वातावरणात भाजपा युवा मोर्चाच्या १५७ शाखेचे शुक्रवारी उद्घाटन झाले. गावातील अनेक युवकांनी प्रस्थापितांच्या दडपशाहीच्या राजकारणाला मोडीत काढण्यासाठी आणि अनेक वर्षापासून अविकसित गावाचा लागलेला शिक्का पुसून काढण्यासाठी सतीश घाटगे यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला.
प्रस्थापित आमदाराने ऊस उत्पादक शेतकऱ्यावर अन्याय करून त्यांच्यावर दडपशाही केली. केवळ राजकारणासाठी युवकाचा वापर केला. विरोधातील लोकांची अडवणूक केली. २५ वर्षाच्या सुडाच्या राजकारणाचा बदला घेण्याची संधी आगामी निवडणुकीत जनतेला आली आहे. दडपशाहीचे राजकारण करणाऱ्यांना जागा दाखवा, असे आवाहन सतीश घाटगे यांनी या वेळी केले.
कुरण गावातील प्रत्येक अडचणीत , संकटात उभा राहणार असल्याचा शब्द सतीश घाटगे यांनी युवकांना व गावकऱ्याना दिला. तसेच गावातील स्मशान भूमी आणि रस्त्याचा प्रश्न देखील सोडविण्याचा शब्द आहे. शाखेतील सर्व पदाधिकारी व पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत करून वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ नेते अनिरुद्ध झिंजुर्डे, भगवान बर्वे , अरुण घुगे, शिवाजी मोरे, विजय खटके, विलास होंडे , राहुल पाटील कणके,बंडू खाडे, राजेंद्र छल्लारे ,प्रभाकर धांडे, बंडू मुंडे, रामकिसन जायभाये,बाबुराव वाळेकर,विलास म्हस्के, सोमनाथ दखणे, शकीलभाई पठाण, इम्रान पठाण, विठ्ठलराव सुडके,पांडुरंग सुडके,संदिप फटांगडे ,पांडुरंग चौधरी , विनोद तिळवणे,अर्जुन वाघ, दत्ता लोने, नजीर शहा ,असिफ कुरेशी, दिपक खरात,सतिश अपार,आबाबासाहेब पवार, शफीक पठाण,प्रमोद रोडी,महेश कांबळे, कृष्णा खरात, निलेश कटारे आदी पदाधिकारी उपस्थित होते.