प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप -2023 हंगामामध्ये सोलापूर जिल्ह्यातील 6 लाख 76 हजार 311 शेतकऱ्यांनी 5 लाख 23 हजार 177 हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा कंपनीकडे विमा भरलेला होता. खरीप हंगाम 2023 अंतर्गत प्रतिकूल परिस्थितीच्या अनुषंगाने अधिसूचित सर्व पिकासाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अधिसूचना निर्मित करून 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई देण्याबाबत पिक विमा कंपनीस आदेशित केले होते. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुरावाला यश येऊन विमा कंपनीने बाजरी, मका व सोयाबीन पिकासाठी 1 लाख 90 हजार 458 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 113 कोटी 82 लाख रुपयांचा निधी थेट जमा केला आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली.
ओरिएंटल विमा कंपनीकडून मका, सोयाबीन व बाजरी पिकासाठी 25 टक्के अग्रीम म्हणून वाटप केलेला निधी व शेतकऱ्यांची संख्या पुढीलप्रमाणे….
1. अक्कलकोट -21 हजार 885 शेतकऱ्यांना 12 कोटी 49 लाख 85 हजार, 2. बार्शी- 88 हजार 402 शेतकऱ्यांना 59 कोटी 32 लाख 32 हजार, 3. करमाळा- 5959 शेतकऱ्यांना 86 लाख 84 हजार, 4. माढा- 2671 शेतकऱ्यांना 27 लाख 28 हजार, 5. माळशिरस- आठ हजार 91 शेतकऱ्यांना एक कोटी 62 लाख 26 हजार, 6. मंगळवेढा दहा हजार एकशे सहा शेतकऱ्यांना 26 कोटी 9 लाख 11 हजार, 7. मोहोळ- 11 हजार 741 शेतकऱ्यांना 7 कोटी 8 लाख 31 हजार, 8. पंढरपूर- 821 शेतकऱ्यांना 8 लाख 80 हजार, 9. सांगोला- 14 हजार 248 शेतकऱ्यांना 4 कोटी 37 लाख 21 हजार, 10. सोलापूर उत्तर- 15 हजार 627 शेतकऱ्यांना 13 कोटी 86 लाख 88 हजार व सोलापूर दक्षिण दहाच्या 979 शेतकऱ्यांना अकरा कोटी तेरा लाख 82 हजार असे एकूण 1 लाख 90 हजार 458 शेतकऱ्यांना 113 कोटी 82 लाख 38 हजाराचा निधी विमा कंपनीकडून थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आला, अशी माहिती गावसाने यांनी दिली.