माढा लोकसभा मतदारसंघातून रणजित निंबाळकर यांना भाजपची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहिते पाटील समर्थकांत अस्वस्थता असल्याचं दिसून येतंय.या ठिकाणी धैर्यशील मोहिते पाटील हे इच्छुक होते, त्यांना डावलून निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी देण्याचा निर्णय भाजपने घेतला. त्यामुळे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून उमेदवारी घ्यावी अशी मागणी समर्थकांकडून करण्यात येतेय. यावर मोहिते पाटील गट आता काय करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपने राज्यातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली असून त्यामध्ये माढ्यातून रणजित निंबाळकरांना संधी देण्यात आली आहे. निंबाळकरांच्या उमेदवारीला मोहिते पाटलांचा विरोध होता. त्यामुळे आता मोहिते पाटील गट मात्र नाराज झाला आहे.आता माघार घेऊ नका, बंडखोरी करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी धौर्यशिल मोहिते पाटलांकडे केली आहे.
गेल्या काही काळापासून मोहिते पाटील आणि रणजित निंबाळकर असा संघर्ष सुरू आहे. त्यातच निंबाळकरांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आता मोहिते पाटील हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.