तभा वृत्तसेवा येरमाळा (सुधीर लोमटे )
राज्य पात्रता परिक्षा (एसईटी) एप्रिल २०२४ ला झालेल्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला असुन त्यामध्ये येरमाळा येथील अनिकेत अश्रूबा बारकुल यांनी भौतिकशास्त्र विषयामध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.सध्या ते येरमाळा येथील ज्ञानोद्योग उच्च माध्यमिक विद्यालयात तात्पुरत्या स्वरुपात कार्यरत आहेत.या यशाबद्दल त्यांचा सत्कार समारंभ विद्यालयात घेण्यात आला.
यावेळी सत्कार कार्यक्रमासाठी प्रा. सुनिल पाटील,प्रा.शिंदे, प्रा.फुगारे प्रा.विनोद बारकुल प्रा.सयाजी बारकुल, प्रा.जाधव,प्रा.कोकाटे,प्रा. कळसे,अजित बारकुल व बाबासाहेब बारकूल हजर होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विद्यार्थी शुभम बारकुल यांनी तर आभार सलोनी बाराते या विद्यार्थीनींने मानले .
अनिकेत बारकुल यांचा कॉलेजचे प्राचार्य एस.एल.पौळ,संस्थेचे उपाध्यक्ष आबासाहेब बारकुल,संस्थेचे कोषाध्यक्ष अंकुश पाटील, शालेय समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब बारकुल व शालेय सदस्यांकडुन सत्कार करण्यात आला.