जाफराबाद प्रतिनिधी
जाफराबाद तालुक्यातील ज्ञानसागर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सिपोरा अंभोरा शाळेत शालेय मंत्रिमंडळ /बालसंसद ची निवडणूक घेण्यात आली यात विद्यार्थ्यामध्ये व उमेदवार यांच्यात प्रचंड उत्साह होता निवडणूक शांततेत पार पडली
निवडणूक मुख्याधिकारी प्राचार्य सुरेशजी दिवटे यांच्या मार्गदर्शनात ही निवडणूक पार पडली
निवडणूक प्रभारी म्हणून ई. के. सोरमारे, विजय भवर, एकनाथ सुरुशे यांनी काम पाहिले. निवडणूक दोन केंद्रात घेण्यात आली त्यात ५ते ७हा गट एका केंद्रात तर ८ते १२हा दुसरा गट दुसऱ्या केंद्रात असे मतदान पार पडले
यात ५ते ७गटाचे ८६%तर ८ते १२गटाचे ८४%मतदान झाले
यात केंद्राध्यक्ष म्हणून अंभोरे व्ही एस, आणि कोतवाल एस जे, तसेच श्र उखर्डे एस आर, अंभोरे व्ही जि, वायाळ एस एस, भोपळे एस एस सोनवणे ए एम, जोहरे जी बी यांनी मतदान अधिकारी म्हणून काम पाहिले
यात सोनुने , लवाळे , बरकले , कांबळे , नाना पंडित , नवले मॅडम, गिरी मॅडम, घुबे ,योगेश भोपळे , संदेश जाधव, पवन जाधव, भक्कंड ,राजेंद्र अंभोरे , ब्राम्हणे यांनी सहकार्य केले, जी जी भोपळे , डी डी अंभोरे, सोरमारे मामा,सरोदे मामा, गाढवे मामा व इत्यादिनी प्रक्रियेत सहभाग घेतला