*विद्यार्थ्यांनो महापुरुषांना जातीत बांधू नका*
*— शंकर कुद्रे*
*देगलूर :* “विद्यार्थ्यांनो महापुरुषांना जातीत बांधू नका. त्यांना वाचा. त्यांचे कार्य समजून घ्या, तरच महापुरुष कळतील”, असे उदगार सुप्रसिद्ध साहित्यिक समीक्षक तथा तज्ञ मार्गदर्शक शंकर कुद्रे यांनी काढले. ते परमपूज्य गोळवलकर गुरुजी विद्यालया तर्फे आयोजित नेतृत्व गुण विकास शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष देगलूरचे सुप्रसिध्द व्यापारी नारायणशेठ पोलावार हे होते.
परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयातर्फे इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व गुण वाढीसाठी एक दिवसीय शिबिर दरवर्षी आयोजित करण्यात येते. तसेच यावर्षी सुद्धा येथील राजशेखर मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. पाच सत्रापैकी दुसऱ्या सत्राचे व्याख्यानाचे पुष्प श्री. शंकर कुद्रे यांनी गुंफले. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रीशताब्दी जन्मवर्षे निमित्ताने त्यांच्याविषयी व श्रमशक्ती या विषयी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.
पुढे ते असेही म्हणाले की, जगातील महिला राज्यकर्त्यामध्ये अहिल्याबाई होळकर यांचे नाव अग्रगण्य ठिकाणी आहे. आम्ही वाचले नसल्यामुळे महापुरुष समजत नाहीत म्हणून अवांतर वाचन वाढवावे. श्रमाला महत्त्व द्या. श्रमशक्ती वाढवा. तरच आयुष्यात यशस्वी व्हाल.अध्यक्षीय समारोप करताना श्री. नारायणशेठ पोलावार यांनी विद्यार्थ्यांनो प्रथम माणूस बना असे आव्हान केले.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री. गंगाप्रसाद कळसकर, सौ. वझलवार ताई, सौ. अटकळीकर ताई सौ. गोले ताई, निरीक्षक म्हणून उदगीर येथून आलेल्या सौ. गोविंदवाड ताई………, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. केंद्रे सर, विभाग प्रमुख श्री. वसंत वाघमारे सर, श्री. मुगटकर सर, वझलवार सर, कुलकर्णी सर, पांचाळ मॅडम, इत्यादी शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.