*परतूर येथे स्काऊट गाईडचे तालुकास्तरीय चर्चासत्र संपन्न.*
लोकमान्य टिळक यांची जयंती साजरी
====
परतूर : प्रतिनिधी
जालना भारत स्काऊट, जिल्हा कार्यालय जालना व शिक्षण विभाग जिल्हा परिषद जालना च्या वतीने आयोजित एक दिवसीय चर्चासत्र दिनांक 23 जुलै 2024 रोजी श्री योगानंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय परतुर येथे उत्साहात संपन्न झाले.
या चर्चासत्राचे उद्घाटन गट समन्वयक कल्याण बागल यांनी केले. यावेळी जिल्हा संघटक स्काऊट के एल पवार, जिल्हा संघटक गाईड श्रीमती सोनिया शिरसाट, विषयतज्ञ डॉ. स्मिता रोडगे, श्रीमती शिंदे पर्यवेक्षक श्री मोगल सर, ज्येष्ठ स्काऊट मास्टर श्री पाटील सर , श्री निर्मळ सर , बाबासाहेब शिरसाट इत्यादींची उपस्थिती होती.
या चर्चा सत्राची सुरुवात स्काऊट गाईड चळवळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल व लोकमान्य टिळक यांची जयंती असल्यामुळे या दोन्ही महान नेत्यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करून स्काऊट गाईड प्रार्थनेने करण्यात आली.
स्काऊट गाईड उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त निर्माण होते, सांघिक भावना निर्माण होते, सर्वधर्मसमभाव, देशप्रेम समाजसेवा इत्यादी गुणांचा विकास होतो.
या माध्यमातून देशाचे भावी चारित्र्यवान चरित्र संपन्न पिढी निर्माण होण्यास मदत होते. त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक शाळेत कब बुलबुल, स्काऊट गाईड पथकाची स्थापना करून त्याची नोंदणी स्काऊट गाईड कार्यालयाकडे करावी. तसेच आपल्या शाळेत या माध्यमातून विविध नाविन्यपूर्ण उपक्रम वर्षभर राबविण्यात यावे असे आवाहन गटसमन्वय कल्याण बागल यांनी केले.
यावेळी स्काऊट गाईडचा अभ्यासक्रम, त्यानुसार विविध उपक्रम, राज्य पुरस्कार व राष्ट्रपती पुरस्कार परीक्षा, सेवा प्रकल्प, समुदाय विकास प्रकल्पांतर्गत विविध उपक्रम याविषयी उपस्थित तज्ञ मार्गदर्शक यांनी सहभागी सर्व स्काऊट गाईडच्या शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. या चर्चासत्रास जालना तालुक्यातील 57 स्काऊट मास्तर, गाईड कॅप्टन यांची उपस्थिती होती.
सदरील चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी कार्यालयीन कर्मचारी साईनाथ ठकूरवार, नंदू आडे तसेच श्री योगानंद माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
======================