राजे शहाजी महाविद्यालयामध्ये तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा संपन्न
वाळूज महानगर ( प्रतिनिधी) :
कृषी व ग्रामीण विकास प्रतिष्ठान संचलित राजे शहाजी महाविद्यालय अंबेलोहोळ ता. गंगापूर जि. छ. संभाजीनगर येथे तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद् घाटन जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई व संस्थेचे कार्यकारी संचालक गणेश बनकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कार्यकारी संचालक बनकर पाटील यांनी विद्यार्थ्याचा खेळामुळे सर्वांगीण विकास होतो व विद्यार्थ्यांन मध्ये शिस्त निर्माण होते
असे प्रतिपादन केले व कुस्तीचे महत्व पटवून देऊन स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या या स्पर्धेमध्ये राजे शहाजी महाविद्यालयाच्या सार्थक पाटेकर याने 80 किलो वजन गटामध्ये प्रथम क्रमांक पटकावला व महेश देवबोने 57 किलो वजन गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला . याप्रसंगी केंद्रप्रमुख नानाभाऊ प्रधान , कैलास जाधव , सी. के. जाधव , हराळ तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पंच म्हणून डॉ. रामेश्वर विधाते प्रा. मंगेश डोंगरे अक्षय वाघ , गोपाल बनावत , इमरान पटेल ,उमेश पिंपळे , सौरभ राऊत यांनी काम पाहिले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.