म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडासंकुलात देशातील पहिले ऑलिम्पिक भवन म्युझियम बांधण्यात येणार आहे. या इमारतीचे भूमीपूजन उपमुख्यमंत्री पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते रविवारी झाले. ७२ कोटी रुपयांच्या या प्रकल्पामध्ये ऑलिम्पिक असोसिएशनची ६१ कार्यालये, आंतरराष्ट्रीय दर्जाचे ऑलिम्पिक संग्रहालय, क्रीडा आयुक्त कार्यालय होणार आहेत.
क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे महासचिव नामदेव शिरगावकर या वेळी उपस्थित होते.