मा आमदार संतोष सांबरे यांच्या मध्यस्थीने कैलास पाटील पुंगळे यांचे तहसील चे उपोषण स्थगीत
तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड 16 जुलै शिवसेना (उद्धवबाळासाहेबठाकरे) पक्षाचे भोकरदन तालुका प्रमुख कैलास पाटील पुंगळे यांनी भोकरदन तहसील कार्यालयासमोर निराधार महिला लाभ्यार्थांसोबत व पदाधिकारी समवेत बेमुदत उपोषणास बसले होते,
संजय गांधी निराधार योजनेच्या लाभ्यार्थ्यांना अनुदान मिळावा, प्रलंबित प्रकरणे मार्गी लावावी श्री क्षेत्र राजूर गणपती चे जुने प्रवेश द्वार उघडावे या मागण्यांसाठी भर पावसात कैलास पाटील पुंगळे यांनी बेमुदत उपोषण सुरु केले होते,
माजी आमदार संतोष सांबरे यांनी तात्काळ भोकरदन तहसील कार्यालयात जाऊन कैलास पुंगळे व उपोषण कर्त्यांची भेट घेतली व तहसीलदार संतोष बनकर यांच्याशी सविस्तर चर्चा करुन विहित मुदतीत सर्व विषय मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन घेऊन कैलास पाटील पुंगळे व शिवसैनिक तसेच वयोवृद्ध महिला भगिनीचे पावसात सुरु असलेले उपोषण स्थगित करण्यात आले,
भोकरदन तहसील कार्यालयात कैलास पाटील पुंगळे यांचे उपोषण सोडविण्यासाठी माजी आमदार संतोष सांबरे यांच्या सोबत मनीष श्रीवास्तव, सुरेश तळेकर, महेश पुरोहित, अर्जुन ठोंबरे, विष्णू भालेराव, भरत पिंपळे, पंकज पिंपळे, अमोल पवार, अर्जुन पिंपळे, समाधान काकडे, बंटी काका, विक्रम कोलते ,जगनबाबा पवार, सचिन गंगावणे, रामराव म्हसूप व पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते