रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग झाला आंधळा आणि बहिरा…….
हदगाव तालुक्यातील निवघा बाजार तिथून पाच किमी अंतरावर शिरड हे गाव आहे निवघा ते कोहळी फाटा रस्ता झाला आहे कोहळी फाट्यापर्यंत खड्ड्यापासून नागरिकांना दिलासा मिळालाय शिरड रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली आहे पावसाचे पाणी खड्ड्यामध्ये साचत असल्याने वाहन चालवताना खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे
या रस्त्यावरून शिरड ते मनुला बु माटाळा पुढे याच रस्त्यावरून विदर्भात पळशी या गावांना जाण्यासाठी प्रमुख रस्ता असल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर वाहनाची दळणवळण होत असते नदीतून येत असताना अगोदरच रस्ता नसल्यामुळे लोकांना नदीपात्रातून रस्ता शोधत शोधत जावे लागत असते त्यातच असा रस्ता त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.. [शालेय विद्यार्थ्यांना बसतोय फटका] निवघा बाजार येथे शाळा व महाविद्यालय असल्याने शिरड मनुला पेवा येथील विद्यार्थी सायकलने शिक्षणासाठी येत असतात त्यामुळे त्यांना सुद्धा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे एखाद्या वेळेस अपघाताची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे……