सोलापूर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनात त्यागमूर्ती माता रमाईचे मोठे योगदान आहे. धीर गंभीरपणे रमाई या बाबासाहेब आंबेडकर यांच्या जगण्याचा आधार बनल्या. संविधानाच्या पानापानात रमाईच्या त्यागाच्या गंध येतो असे प्रतिपादनगांधीवादी विचारवंत, ज्येष्ठलेखिका माया बदनोरे यांनी केले.
करुणाशील समितीच्या वतीने माता रमाई जयंती निमित्ताने आयोजित महाथेरी सन्मान सोहळ्याप्रसंगी त्या बोलत होत्या अध्यक्षस्थानी सोलापूर विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव शिवाजी शिंदे हे होते.
मंचावर निवृत्त प्राचार्य डॉ. नसीमा पठाण, करुणाशील समितीचे प्रमुख आशुतोष नाटकर , ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत प्रा.एम.आर.कांबळे, प्रा. नरेश बदनोरे, मारुती कटकधोंड, पद्माकर कुलकर्णी आदी उपस्थित होते. अध्यक्ष मनोगतात रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने माता-भगिनींचा माता महाथेरी यांच्या नावाने सन्मान होत आहे अभिमानास्पद गोष्ट असल्याचे मत डॉ. शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.
प्राचार्य नशिमा पठाण यांनीही या उपक्रमाचे कौतुक करून सत्कारमूर्तींच्या कार्याचा गौरव केला. प्रारंभीपाहुण्यांच्या हस्ते तथागत गौतम बुध्द, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई यांच्या स्मृतींना पुष्प अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. सत्कारमूर्तींनी आपले मनोगत व्यक्त करुन कृतज्ञता व्यक्त केली.श्रीपाद येरमाळकर यांनी सूत्रसंचालन तर संयोजक आशुतोष नाटकर यांनी प्रास्ताविक व आभार मानले.
यांचा झाला गौरव
ज्येष्ठ समाजसेविका शेवंताबाई मोरे, इंदुमती कांबळे, माजी महापौर अलका राठोड, कालम्मा मंडेपू, प्रा.डॉ. आशा राेकडे-किर्तीकर, उपमुख्याध्यापिका डॉ. सुरैय्या सय्यद, ज्येष्ठ लेखिका संध्या धर्माधिकारी, ज्येष्ठ धम्म उपासिका धम्मरक्षिता कांबळे, मंगला बंगाळे, सुचित्रा थोरे, श्रीमती मनिषा माने

























