रिक्षा चालकाचा मुलगा झाला सि. ए.
सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव….
संजय निकम
वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरात गेल्या तीस वर्षापासून रिक्षा चालवून व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करून पोटाला चिमटा घेऊन आपल्या मुलाला सि.ए.बनविले मुलगा सि.ए.ची परीक्षा पास झाल्याने परिसरातील नागरिकांनी वडील अशोक मुरलीधर डोंगरे व मुलगा प्रणव अशोक डोंगरे यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अशोक मुरलीधर डोंगरे यांना दोन मुले असून मोठा प्रणव अशोक डोंगरे तर दुसरा प्रतीक अशोक डोंगरे असे आहेत. प्रणव अशोक डोंगरे याचे बारावी पर्यंत शिक्षण तनवाणी कॉलेज येथे झाले असून त्याला बारावीला 88% टक्के पडले, त्याने पुढे सि पी टी परीक्षा दिली नंतर सरस्वती भुवन येथे बी. कॉमची पदवी घेऊन “द इन्सट्युट ऑफ चार्टेड अकाउंट ऑफ इंडिया”येथे पाच वर्ष अभ्यास करून तो यावर्षी 2024 ची सि. ए.ची परीक्षा उत्तीर्ण झाला.
वडीलअशोक मुरलीधर डोंगरे यांनी व आई सुरेखा अशोक डोंगरे यांनी कंपनीत जाऊन अतिशय कष्ट घेऊन आपल्या मुलाला शिकविले आणि सि ए केले याचा त्यांना सार्थ अभिमान आहे, गेली तीस वर्ष त्यांनी रिक्षा चालवून आपले जिवन संघर्षात काढले. आता मुलगा सि ए झाल्याने पूर्वीच्या इतका त्यांना संघर्ष करण्याची आवश्यकता नसल्याचे त्यांनी सांगितले.
या त्याच्या यशा बद्दल तनवानी कॉलेज चे सर्व प्राध्यापक, एस बी कॉलेज चे सर्व प्राध्यापक,सि ए युनिटचे सर्व प्राध्यापक, आई वडील आदींना श्रेय जात असल्याचे प्रवीण यांनी सांगितले आहे