जीप सातवेळेस पलटी होऊनही तीन चिमुकल्यासह सहा जण सुखरूप बचावले आहेत. मृत्यूला ही चकवा देणारी घटना पंढरपूर तालुक्यात करकंब या गावाजवळील पेट्रोल पंपासमोर घडली. हा सर्व प्रकार तिथे असलेल्या सीसीटीव्हीम ध्ये कैद झाला आहे.
अपघातात दोघी बहिणींनी प्रत्यक्ष मृत्यूचा थरार अनुभवला. यामुळेच काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती, याचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी घेतला. भोसे येथील बंडू जगताप यांच्या शुध्दी जगताप (वय १०), स्वरा जगताप (वय ८) या दोन्ही मुली उन्हाळी सुट्टीसाठी आत्याच्या गावी पुणे येथे जात होत्या.
या गाडीमध्ये दोन महिला, एक मुलगा व तीन मुली होत्या. करकंबजवळ एका पेट्रोल पंपासमोर जीपमध्ये अचानक बिघाड होऊन काही सेकंदात ती सातवेळा पलटी झाली. या अपघातात रमेश गायकवाड हे बाहेर फेकले गेले रस्त्यावर डोके आपटल्याने ते गतप्राण झाले. मात्र जीपमधील शुब्दी, स्वरा या दोघी बहिणी फुटलेल्या काचेतून सुखरूप बाहेर आल्या. इतर दोन महिला, एक मुलगा, एक मुलगी असे चौघेजण जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान दोन्ही बहिणींनी मृत्यूचा थरार पहिला.