उमरी ( प्रतिनिधी) तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव असलेल्या तळेगाव ह्या ग्राम पंचायतीने जीईएम पोर्टलवरून गावातील जिल्हा परिषद कें. प्रा. शाळा, जि. प. प्रा. शाळा वाल्मिकनगर, अनुक्रमांक १ ते ५ च्या अंगणवाडी व आरोग्य उपकेंद्राला १५ व्या वित्त आयोग निधीतुन साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सरपंच सौ. संतोषीताई सुरेशराव देशमुख ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. आर. आडबडवार, बालविकास प्रकल्प अधिकारी पी. एच. चटलावार, तालूका वैद्यकिय अधिकारी जी. एच. वाडेकर, शिक्षण विस्तार अधिकारी शंकरराव बेळकोणे, विस्तार अधिकारी पंचायत सुनिल मोटरवार
केंद्र प्रमुख विनायक होनशेट्टे, मुख्याध्यापक शंकर मुक्कावार, सेवानिवृत्त उपअभियंता जि. प. बांधकाम विभाग भोकर आर. एम. चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
सदरील कार्यक्रमात सर्व अंगणवाडी ला प्रत्येकी एक स्टिलचे कपाट, गॅस सिलिंडर, गॅसची शेगडी, एक टेबल व पांच खूर्च्या देण्यात आल्या, आरोग्य उपकेंद्राला रु. १.५०,०००/- ची उपकरणे देण्यात आली, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेला एक कलर प्रिंटर, खेळाचे साहित्य व तिन हॅन्डवाॅश देण्यात आले, जि. प. प्रा. शाळा वाल्मिकनगर येथे एक एलईडी, एक टेबल व पांच खूर्च्या देण्यात आल्या.
सदरचे संपूर्ण साहित्य हे अव्वल दर्जाचे असून अशा पध्दतीने १५ व्या वित्त आयोगाचे निधीचा वापर करुन जीईएम पोर्टलवरून दर्जेदार साहित्य पुरवठा करणारी ही तालूक्यातील पहिली ग्राम पंचायत असल्याचे मनोगत गटविकास अधिकारी आडबडवार यांनी व्यक्त करुन ह्या ग्राम पंचायतीचे इतरांनी अनुकरण करावेअशी भावना व्यक्त केली.ह्या प्रसंगी सर्व मान्यवरांचा ग्राम पंचायत तळेगावच्या वतिने सत्कार करण्यात आला. ह्याप्रसंगी सेवानिवृत्त उपअभियंता आर. एम. चव्हाण यांचाही सेवानिवृत्ती बध्दल सत्कार करण्यात आला.
ह्या प्रसंगी माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी, गटविकास अधिकारी आडबडवार, विस्तार अधिकारी मोटरवार, जय वनसागरे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक ग्राम विकास अधिकारी व्ही. जे. बैलकवाड यांनी केले तर आभार उपसरपंच प्रतिनिधी लुखमान बेग यांनी मानले.
कार्यक्रमास लालूरेड्डी कप्पावार, एजाजबेग मोगल, माधवराव जाधव, मुसाबेग चाॅदपाशा बेग, बशीरबेग मोगल, देविदास रज्जेपवाड, रसुलबेग पाटील, खैसरबेग मोगल, दत्ता अमृतवाड, पांडुरंग गणगोपलाड, चंद्रकांत उपलवाड, तुळशीराम खंडेलोटे, दत्ता जाधव, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, जिल्हा परिषद शाळेचे कर्मचारी व गावातील बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होते.