तभा वृत्तसेवा
अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
वडीगोदी दि 1/8/2024 गुरवारी मध्यरात्री साडेबारा ते सव्वा एकच्या सुमारास गावामध्ये तीन ते चार चोर आल्याचे नागरिकांना कळले व सदरील नागरिकांनी फोन द्वारे गावामध्ये चोर आल्याचे सर्वांना सांगितले व सर्वांना सावध केले सर्व गावातील नागरिक सावध झाल्याने मोठा अनर्थ टाळला वडीगोद्री गावामध्ये चार-पाच घराचे कुलूप तोडून चोराच्या हाती काही नाही लागली
व काहींच्या घरात तर काहींचे गेटचे कुलूप तोडून बंगल्यामध्ये प्रवेश केला घरातील नागरिक जागे असल्याचे चोरांच्या लक्षात आले व तिथून पळ काढला चोरट्याने आपला मोर्चा तेथून तेथूनच जवळ असलेल्या खटके वस्ती कडे वळवला श्रीमंत खटके यांच्या घरासमोर सीसीटीव्ही फुटेज मध्ये तीन चोर आढळून आले सध्या वडीगोद्री गावात व परिसरात नागरिकांच्या मनामध्ये भीतीच वातावरण आहे तरी पोलीस प्रशासनाने याकडे गांभीरतेने लक्ष देण्याची गरज आहे