सोलापूर – जिल्हा परिषदेच्या १०० अधिकाऱ्यांनी गावात मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधला. मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियाना अंतर्गत गावात मुक्काम, महाश्रमदान व वृक्षारोपणाची मोहिम राबविण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील हजारो नागरीकांनी महास्वच्छता मोहीमेत सहभाग घेतला. सीईओ कुलदीप जंगम यांनी अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ येथे मुक्काम करून ग्रामस्थांशी संवाद साधत भजनात तल्लीन झाले.
जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख , पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विभाग प्रमुख यांनी देखील या मोहिमेसाठी गावात मुक्काम करून महास्वच्छता अभियान अंतर्गत श्रमदान केला.

पहाटे सिईओ वृक्षारोपणासाठी बांधावर
..
……………………..
शिरवळ येथे मुक्कामी असलेले सिईओ जंगम भल्या पहाटे बांधावर जाऊन ग्रामस्था समवेत वृक्षारोपण केले.
रात्री मुक्कामावेळी सिईओ जंगम यांनी घोंगडी बैठकीतून ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थां समवेत हरिनामाच्या भजनात सिईओ जंगम तल्लीन झाले होते. यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ उपस्थित होते .
….
शंभर विभाग प्रमुखांचा गावात मुक्काम
…………………
मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियान प्रभावीपणे राबविण्या साठी सिईओ कुलदीप जंगम, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी शिरवळ येथे मुक्काम केला. तर अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील हागलूर येथे मुक्काम केला. उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी सांगोला तालुक्यातील वाढेगाव येथे मुक्काम केला. पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे मुक्काम केला . उर्वरीत विभागप्रमुखांनी विविध गावात मुक्काम करून जनजागृती केली.

















