Friday, February 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सांगोला क्रीडा संकुलासाठी तीन कोटीचा निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
June 27, 2024
in political
0
सांगोला क्रीडा संकुलासाठी तीन कोटीचा निधी मंजूर – आमदार शहाजीबापू पाटील
0
SHARES
310
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण करण्याचा मानस, ५२ कोटींचे अंदाजपत्रक सादर

सांगोला (तालुका प्रतिनिधी): सांगोल्यातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण व्हावे यासाठी खेळाच्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सांगोला येथील क्रीडा संकुलासाठी ३ कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली आहे. क्रीडा संकुल समितीने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ५२ कोटी ९४ लाख ९५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. यापूर्वी या क्रीडा संकुलासाठी एक कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

तसेच नव्याने मंजुर झालेल्या ३ कोटींच्या निधीचा वापर हा तालुका क्रीडा संकुलात टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल, खो-खो मैदान, कबड्डी, फूटबॉल मैदान, वॉकिंग ट्रॅक, मुलामुलीचे वसतीगृह (तळमजला) अशा सुविधा निर्माण करण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

सांगोला शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल उभा करून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण करण्यासाठी आमदार शहाजीबापू पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सांगोला येथील दहा एकर जागेत असलेल्या क्रीडा संकुलात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा संकुल समितीने ५२ कोटी ९४ लाख ९५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर केले आहे. सदर संकुलास यापूर्वी १ कोटी ९ लाख ५४ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती.

क्रीडा संकुल समितीस वाढीव शासन अनुदान मर्यादा विचारात घेऊन यापूर्वी झालेला खर्च एक कोटी व सुधारीत ३ कोटी रुपये असे मिळून चार कोटी रुपयांच्या अंदाजपत्रक आराखड्यास सुधारीत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या निधीतून टेनिस कोर्ट, बास्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल, खो-खो मैदान, कबड्डी, फूटबॉल मैदान, वॉकिंग ट्रॅक, मुलामुलीचे वसतीगृह (तळमजला) व इतर खर्च याचा समावेश आहे.

तसेच सदर क्रीडा संकुलाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये ४९ कोटी ९४ लाख ९५ हजार रुपयांचे अंदाजपत्रक सादर करण्यात आले असून यामध्ये ४०० मी धावणे ट्रॅक अद्यावतीकरण, इनडोअर हॉल (४०.८१ मी x २४.९० मी. दुमजली, वुडन फ्लोरिंग, एअर कंडीशन, ऑकेस्टिक), गेस्ट
हाऊस (२ मजली, डायनिग व किचन हॉलसह), जलतरण तलाव, डायव्हिंग पूल, डायव्हिंग बोर्डस व जिना, बॅलेसिंग टँक, फ्लिट्रॅरेशन प्लांट, जलतरण साहित्य, प्रेक्षक गॅलरी २० दुकान गाळासह, स्वच्छतागृह), मुले-मुली वसतिगृह (प्रत्येकी ३ मजली, डायनिग व किचन हॉल सह), कर्मचारी निवासस्थान, संरक्षक भिंत, प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, पाण्याची व्यवस्था, अंतर व बाह्य विद्युतव्यवस्था, सोलर ग्रीड व्यवस्था, पथदिवे, लँडस्केपिंग, पाणी साठवण व्यवस्था (ओव्हर हेड व अंडर ग्राऊड), लिफ्ट व्यवस्था याचा समावेश आहे. सदर क्रीडा संकुलातील वाढीव बाबींचे प्रस्तावित्त अंदाजपत्रक ४९ कोटी ९४ लाख ९५ हजार रुपयांचे असल्याने हा प्रस्ताव मान्यतेसाठी राज्य मंत्रिमंडळासमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती आमदार शहाजीबापू पाटील यांनी दिली.

चौकट
क्रीडा संकुलाच्या माध्यमातून सांगोला सारख्या ग्रामीण भागातून राष्ट्रीय व आतरंराष्ट्रीय खेळाडू निर्माण व्हावेत, यासाठी क्रीडा संकुलमध्ये अधिकाधिक दर्जेदार सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडविण्याची क्षमता या तालुक्यात आहे. त्यासाठी उत्तम दर्जाच्या सोयीसुविधा खेळाडूंना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. या सुविधा निर्माण करण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जातील. – आमदार शहाजीबापू पाटील

Post Views: 25
Previous Post

राजकारणाच्या पलिकडे जाऊन काम करण्याची गरज- राष्ट्रपती

Next Post

वाशी येथील जिल्हा परिषद शाळेत राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
वाशी येथील जिल्हा परिषद शाळेत राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी

वाशी येथील जिल्हा परिषद शाळेत राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी

ताज्या बातम्या

सोलापूर पुणे महामार्गावर अपघात कारचालक जागीच ठार..#public #viral #acsident

February 13, 2026

पुण्यातील रिक्षा चालकासह सोलापुरातील विधी संघर्ष बालकाला अटक केली आहे.#public #solapurnews #crime

February 13, 2026

भारत खरेदी करणार 114 राफेल विमान.#india #france #public #viral

February 13, 2026

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त १३ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन.#public

February 13, 2026

सोलापूर महानगरपालिका बनणार चकाचक डिजिटल.#public #marathinews #viral

February 13, 2026

राजकारण नव्हे रंगली कुस्ती.#viral #solapurnews #public #marathinews #aajsolapur

February 12, 2026

महिला पत्रकाराचा केला घोर शब्दात अपमान.#viral

February 12, 2026

देशव्यापी कामगार संघटनांच्या संपात गर्जले कामगार नेते…

February 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0677986

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697