उमरी ( प्रतिनिधी ) उमरी तालुक्यातील लाडक्या बळीराजा कर्जबाजारी भावाला कर्जमुक्त करुन शेजारील तेलंगणा राज्याप्रमाणे येथिल बळीराजा भावाला खरिप हंगामात पेरणी अगोदर प्रती एकर(क्षेत्र अमर्यादित) विस हजार रुपयाचे आर्थिक मद्त करा अशी मागणी उमरी माजी शिवसेना प्रमुख तथा माजी समन्यवय सामती अध्यक्ष साहेबराव पाटील शिंदे यांनी केली आहे .
निवेदनात साहेबराव पाटील शिंदे म्हणाले बळीराजावर नैसर्गिक संकटांना सातत्याने सामोरे जावे लागते कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा दुष्काळ सतत पाऊस पडत असल्यांने पिकांना रोगाच्या प्रार्दुभावामूळे नुकसान सोसावे लागते मुलांचे शिक्षण ,आरोग्य,लग्न, बॅकेच्या कर्जाचे परतफेड वेळेत होत नसल्यांने बळीराजाला आत्महत्या शिवाय दुसरा पर्यायच नसल्यामूळे अखेर कर्जबाजारी पणाला कंटाळूण बळीराजा जिवन यात्रा संपवतो शासनाचे लक्ष वेधण्यासाठी स्वतंत्र्य दिना निमित्त गुरुवार दिनांक १५आॅगस्ट २०२४ रोज उमरी तहसिल कार्यालया समोर बेमुदत लाक्षणिक उपोषणास बसत असल्याचे निवेदन शिवसेना उध्दवजी बाळासाहेब ठाकरे गटाचे निष्ठावंत कडवट शिवसैनिक साहेबराव पाटील शिंन्दे यांनी दिला आहे .
बेमुदत उपोषणाच्या मागचा या प्रमाणे महात्मा गांधी नरेगा योजनेतून सिंचन विहीरीसाठी क्षेत्र पाच हैक्टर पर्यंत बळीराजांना मंजूरी द्यावी ,सर्व बँकेमार्फत बळीराजांना कर्ज मंजूरीसाठी सिबील स्कोरची अट शिथिल करून पिकांवर कर्ज रक्कम देण्याऐवजी बँकेला बळीराजांने शेती भांडवलासाठी मागेल तेवढे कर्ज स्थानिक बँक शाखेत मंजूरी देणे, राज्य मार्ग S.H.W.- २५१ उमरी – भोकर (मौ.सोमठाणा / शिरुर)रस्त्यालगत (सौर ऊर्जा ) विद्युत खांबे विना परवाना उभे करित असून मुख्यरस्त्याच्या किमान कमीत कमी ५० मिटर किंवा १००मिटर अंतरावर उभे करायला हवे होते PWD च्या सां.बां.विभाग अधिका-यांना हाताशी धरुन चिरेमिरे देऊन विद्यूत खांबे उभे करण्यात आले आहे ते जून महिन्या मध्ये वादळी वा-याने ती खांबे मुख्यरस्त्याच्त्रा मध्मभागी पडून मुख्यरस्ता बंद झाला
जिल्हाधिकारी अभिजीत राउत व स्थानिक तहसिलदार ,पोलीस निरीक्षक यांच्या आदेशाने रस्त्यात पडलेले खांबे तातडीने बाजूला करण्यात आले मानव जिवित हाणी टाळण्यासाठी पुन्हा विद्यूत खांबे उभे केलेले रद् करण्यात यावे संबधीतावर गुत्तेदार उच्चीत कार्यवाही करण्यात यावी ,उमरी शहरालगत सरकारी जमिन गट क्रं. १८० क्षेत्र ६ः ७९ आर तळ्याच्या जागेवरती मुस्लीम स्मशानभुमीची तटरक्षक भिंत बांधकाम केल्यांने आपल्या विभागीय कार्यालया भुमी अभिलेखा मार्फत जागेची मोजणी करुन तळ्याच्या जागेवरती अतिक्रमणमुक्त करून बांधकाम केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हे दाखल करणे,
उमरी नगर परिषद हद्दीत मुख्यरस्ते व चौका चौकात सि.सि.टी.व्ही.कॅमेरे बसून गुन्हेगारीला चाप बसण्यासाठी पोलीस प्रशासनाला मद्दत होईल त्या प्रमाणे कॅमेरे बसविण्यात यावे , सन २०२३ पीक विमा इफकोटोकीया कंपनीने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केलेल्या बळीराजांना पीक विमा मंजूर करून तातडीने खात्यात जमा करावे अशा या विविध मागण्या संदर्भात विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, विभागीय आयुक्त,जिल्हाधिकारी,तहसिलदार,मुख्याधिरी नगर परिषद,पोलीस निरिक्षक,यांना निवेदना व्दारे कळविले आहे उमरी तालुक्यातील पुन्हा साहेबराव शिंदे यांनी बळीराजांना असे नम्र अवाहन केले आहे की सदर मागण्या संदर्भात शेतकरी वर्ग जास्ती जास्त संख्येने आपल्या न्याय हक्कासाठी बेमुदत लाक्षणीक उपोषणाला उपस्थित रहावे असे अव्हाण केले आहे . या वेळी बेमुदत उपोषण स्थळी साहेबराव पाटील शिंदे या सोबत ,दादाराव पाटील पूयड,कैलास पाटील हातनिकर,अशोक पाटील जोगदंड,बाबुराव पाटील भुत्ते,राजू पांचाळ,दिगांबर ईंगळे आदी शिवसैनिक शेतकरी उपस्थित राहणार आहेत .