मुदखेड ता प्र
बारड नगरीत थोर स्वातंत्र्य सेनानी साहेबराव देशमुख यांच्या २३ व्या पुण्यतिथी निमित्ताने ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी निजाम कालीन आठवणींना उजाळा देत बापूंना सामुहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
नांदेड जिल्ह्याच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान असणारे तथा निजामाच्या जुलमी राजवटीत स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ यांच्या खांद्याला खांदा लावून लढणारे तथा उमरी बँक लुटीत महत्वपूर्ण योगदान देणारे साहेबराव देशमुख बारडकर यांच्या २३ व्या पुण्यतिथी निमित्ताने दि. ११ जुलै रोजी स्वातंत्र्य सैनिक स्मारकात स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बापूच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाबुराव कोंडेकर, युवा नेते रवींद्र उर्फ बंडू चव्हाण, सुनील देशमुख, ऍड संदीप देशमुख यांनी अभिवादन केले.
ग्रामपंचायतच्या वतीने सरपंच प्रभाकर आठवले यांच्या हस्ते पुष्पांजली वाहण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रताप देशमुख, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवानंद शिप्परकर, राज बहाद्दूर कोत्तावार, उपसरपंच बाळासाहेब देशमुख, शिवसेना जिल्हा उपप्रमुख माणिक लोमटे, जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील डोंगरगावकर,
शहर प्रमुख कैलास गोडसे, युवकचे मुजीब पठाण, माजी सरपंच, विलासराव देशमुख, श्रीनिवास महादवाड, उत्तमराव लोमटे, संजयराव मुलंगे, के डी देशमुख, नवनाथ देशमुख, नरहरी आठवले, श्रीराम कोरे, ग्रा. सदस्य राहुल आठवले, संदीप कवळे, नर्सिंग आठवले, संदिपकुमार देशमुख, भास्कर कळणे, दादाराव कल्याणे, गजानन रावसाहेब, महेश देशमुख, बाबुराव देशमुख, संजय सावंत आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांकडून अभिवादन