वाळूज महानगर (प्रतिनिधी)
15 ऑगस्ट या दिवसाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 24X7 पेस्ट मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीचे मालक संदीप गिरे व त्यांच्या टीमने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोलवाडी या शाळेला भेट दिली व के.ओ.गिरे यांच्या स्मरणार्थ शाळेमध्ये मुलांना शिकण्यामध्ये आवड निर्माण व्हावी म्हणून सर्व वर्गाला व्हाइट बोर्ड, डस्टर, मार्कर पेन दिले व सोबतच मुलांना खाऊ वाटप केला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यीका मरणकळाकार जनाबाई गिरे ,
माजी महापौर अशोक सायंना यादव,सरपंच भारती कनिसे, उद्योजक संदीप गिरे, वैशू गिरे हे होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी 24X7पेस्ट मॅनेजमेंट कंपनीची संपुर्ण टीम ,शाळेच्या शिक्षिका डी एस.बनकर, एस एस भदाणे, एस एस पाटील, एडी झोटे, एमजी बबछेडे व सर्व शिक्षक वर्ग यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. याप्रसंगी गावातील नागरिक व विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.