उमरीच्या माॅडर्नने प्रभात फेरीतुन दिला पर्यावरणाचा संदेश…
उमरी ( प्रतिनिधी )उमरी येथील माॅडर्न इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र दिनाचे निमित्ताने शहराच्या मुख्य रस्त्यावरुन सायकल रॅली काढून पर्यावरणाचा संदेश दिला.
शाळेत सकाळी ७:३० वाजता आदर्श शिक्षिका म्हणून सन १९९७ ला राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या सौ. कुमुदिनी अरविंद ढवळेकर यांचे हस्ते झेंडावंदन झाले.
त्यानंतर शहरातील प्रमुख रस्त्याने शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली त्यात शाळेचे बॅंडपथक, स्काऊट, गाईड चे विद्यार्थी, तसेच इको क्लब अर्थात पर्यावरण संवर्धनासाठी विद्यार्थ्यांचे समुहाने काढलेली सायकल रॅली प्रभात फेरीचे प्रमुख आकर्षण होते.
शिस्तबध्द निघालेली प्रभात फेरी, भारतमाताकी जय, वंदेमातरमच्या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेले होते.
सायकल रॅलीचे शहरातील नागरिकांनी व पालकांनी कौतुक केले. ह्या रॅलीत नर्सरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. अनुराधा संजय कुलकर्णी, संचालिका सानिका कुलकर्णी आणि सर्व स्टाफने मेहनत घेतली.