उमरीत आमदार राजेश पवार यांचे बंजारा समाजाकडून इतिहासीक जंगी स्वागत .
——————————
उमरी ( प्रतिनिधी ) नायगाव विद्यानसभा मतदार संघाचे विकास पुरुष कार्य सम्राट आमदार राजेश पवार यांचे उमरी शहरात बंजारा सराजाच्या पारंपारिक वादय पद्धतीने जंगी इतिहासीक स्वागत करण्यात आले आहे .
उमरी शहरातील बंजारा समाजाचे हृदय स्थान असलेल्या संत सेवालाल महाराज यांच्या मंदिराचे भुमिपुजन आमदार राजेश पवार व जि प . सदस्या पुनमताई पवार यांच्या हस्ते थाटात उदघाटन करण्यात आले यावेळी बंजारा काशी पोहरा देवी धर्मभुरू गादीपती प .पु .श्री बाबुसिंग महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती . प्रमुख पाहुणे म्हणून सुखदेव महाराज सितानगर , तारासिंग महाराज हुन्डातांडा , श्रीचंद महाराज ईश्वरनगर , रोहीदास महाराज फुलसिंग नगर माजी सभापती नानू नाईक , माजी नगराध्यक्ष सुभाष पेरेवार , भाजप तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पा सांवत आदी मान्यवराची उपस्थिती होती .
प्रथम संत सेवालाल महाराज या सह सर्व महापुरुषाची पुज्या मान्यवराच्या हस्ते करण्यात आले . विशेष म्हणजे उमरी शहरात क्रिडा संकुलणात बंजारा समाजाने धरलेली जागा शासकीय गायरान मध्ये गेल्याने गौर सेना संघटना नाराज होती त्या बदल्यात इतर जागा चार प्लाटाची घेण्यात आली होती . हा बजारा समाजाचा संघर्ष सार्वजनिक बांधकाम विभागाचे जेई जुगल जाधव यांनी सदर प्रकरणाची इदभूत माहाती आमदार राजेश पवार यांना सविस्त मांडणी करून सांगीतली . आमदार राजेश पवार नांदेड जिल्हाच्या आमदारा पेक्षा अधिक विकास निधी आनुन मतदार संघाचा काया पालट केला हे विशेष आहे .
जेई जुगल जाधव यांनी आमदार राजेश पवार यांना समाजाच्या व्यथा सांगीतल्यावर आमदार राजेश पवार यांनी विशेष स्वः खर्चाने ८ (आठ ) प्लॉट खरेदी करून बंजारा समाजाला जागा दान दिली आहे आणि मंदिर उभारण्याची संकल्पना दिली.
त्या अनुषंगाने १८ जुलै रोजी रोजी दुपारी उमरी तालुका बंजार समाजाच्या वतिने १३३ के .व्ही लाईट ऑफीस जवळील संत सेवालाल महाराज यांचे मंदिराचे भुमिपुजन व भोग भंडार कार्यक्रम आयोजित करण्यात आला . यावेळी बंजारा पारंमपारीक पद्धतीने आमदार मोहृदय त्यांच्या सुविधा धर्म पत्नीचे जोरदार स्वगात वाजत गाजत करण्यात आले उदघाटन आमदार राजेश पवार व बंजारा धर्मगुरू बाबुसिंग महाराज यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले .
यावेळी बंजारा समाजातील मान्यवरांनी समाजाला बंजारा भाषेत संबोधीत करीत आज पर्यंत बंजारा समाजाची व्यस्था कोणत्या ही आमदार खासदार यांनी केले नाही पण आमदार राजेश पवार यांनी केल्याची सांगुन येणारा राजकीय काळत बंजारा समाज आ राजेश पवार यांच्या पाठीशी आहे हे जाहीर केले आहे . पुनमताई यांना बंजारा समाजाचे मातृत्व म्हणून समाजाच्या समस्या सोडवण्याची विनंती केली आहे .
यापुढे आमदार राजेश पवार म्हणाले की प्रत्येक महापुरुषाचे पुतळे उमरी शहारात उभा करण्याचा माझा मानस असून पुतळा बघितला तर त्या महापूरूषाच्या कार्याची जाणीव होईल त्यांच्या थोर समाजसेवक म्हणून एका प्रकारे आर्दश घडविला त्यांच्या इतिहास डोळ्या समोर राहील . बंजारा समाज नन्हे तर प्रत्येक समाजासाठी आमदार म्हणून एक सामाजिक बांधीलकी म्हणून सतत कार्य करणार आहे विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून फेक अश्वासन मी देत नाही पण निधी मंजूर करून गावचा शहराचा विकास करताना तुम्ही पहात आहातच , यापूर्वी उमरी तालुक्यात बंजारा समाजाला वाडीतांड्या भरपूर असा सभा मंडपासाठी , रस्त्यासाठी निधी दिला आहे केवळ मतासाठी नाही तर समाज परिवर्तन विकशिल झाला पाहिजे हाच माझा मुख्य हेतू आहे . भर पाऊसात ही बंजारा समाज मोठ्या प्रमाणात उपस्थित होत .
यावेळी बंजारा समाजाचे तालुकाध्यक्ष कैलास आडे , गौर सेनेचे विष्णू जाधव , पत्रकार आनंदा राठोड , माजी सरपंच वंसत जाधव वाघाळा ,रोहीदास राठोड ( हुन्डा सरपंच ) उतम जाधव (मोखांडी सरंपच प्र ) , नागराज राठोड , बळीराम राठोड , राम जाधव , स्वप्नील जाधव , आकाश जाधव , उत्तम राठोड , देविदास राठोड , देविदास पवार , सुरेश जाधव , शामराव चव्हाण , रामराव राठोड आदी बंजारा समाज एववटला होता या कार्यक्रमाचे सुरेश सुत्रसंचालन बाबुराव जाधव गुरुजी यांनी केले तर आभार सार्वजनिक बांधकाम विभाग इंजनियर जुगल जाधव यांनी केले आहे .