उन्नव, 10 जुलै (हिं.स.) : उत्तरप्रदेशच्या उन्नावजवळ आग्रा-लखनऊ एक्सप्रेस वेवर टँकर आणि बसची धडक होऊन भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 18 जण मृत्यूमुखी पडले असून 30 जण गंभीर जखमी झाले आहे. यासंदर्भातील माहितीनुसार, डबल डेकर
बस (वाहन क्र. युपी-95 टी-4720) बिहारमधील सीतामढीहून दिल्लीला जात होती.
उन्नावमधील बेहता मुजावर पोलीस स्टेशन हद्दीतील गधा गावासमोर पहाटे 4.30 वाजता पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या दुधाच्या टँकरने बसला ओव्हरटेक केले आणि यादरम्यान बसला धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता की डबल डेकर बस दोन ते तीनवेळा पलटी होऊन त्याचे दोन तुकडे झाले. या अपघाताची माहिती माहिती इतर वाहनचालकांनी दिली. माहिती मिळताच बांगरमाऊचे निरीक्षक पोलीस फौजफाट्यासह घटनास्थळी पोहोचले.
त्यांनी जखमींना उपचारासाठी बांगरमाळ सामुदायिक आरोग्य केंद्रात दाखल केले. डॉक्टरांनी 18 जणांना मृत घोषित केले. गंभीर जखमी प्रवाशांना डॉक्टरांनी लखनऊच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवले आहे. मृतांमध्ये 14 पुरुष, 3 महिला आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. या घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.