बळीराम जगताप
वाशी धाराशिव
९४२१३५२७३८
अजिंक्य विद्यालय च्या 4 00 विद्यार्थ्यांची वारकरी दिंडी वाशी वाशी जिल्हा धाराशिव येथील अजिंक्य विद्यालयातील 400 विद्यार्थीनी आज दिनांक 16 रोजी वारकरी दिंडी काढण्यात आली
वाशी वारी दिंडी सोहळ्याचा अनुभव वारकरी संप्रदाय परंपरेची माहिती व्हावी म्हणून दिंडी काढण्यात आली अजिंक्य विद्यालय दरवर्षी वारकरी दिंडी सोहळ्यात सहभाग घेतात वारी सोहळ्याची माहिती व्हावी यासाठी दरवर्षी दशमीला विद्यार्थ्यांची दिंडी काढली जाते त्यामध्ये पालखीची मिरवणूक काढण्यात येते पालखीमध्ये विठ्ठल रुक्मिणी मूर्ती ठेवलेली असते मिरवणुकीमध्ये काही भाविक वृद्ध महिला पालखी मधील विठ्ठलाचे दर्शन घेत होते या दिंडीमध्ये गावातून लक्ष्मी नगर शिवाजीनगर मार्गे गावातून मिरवणूक काढली जाते दिंडीमध्ये लहान लहान छोट्या मुलींनी
“चल ग सखे चल ग सखे पंढरीला ” या गाण्यावर ताल धरला होता तसेच मुखातून “विठ्ठल माझा माझा मी विठ्ठलाचा” चालू होता काही ठिकाणी मुलींनी फुगड्यांचा ही ताल धरला होता संत ज्ञानेश्वर संत सावता माळी संत सारखा पोशाख परिधान करून गळताळ व फेटा बांधून सहभाग घेतला होता त्यामुळे गावातील नागरिक दृश्य पाहून भक्तिमय वातावरणात रमून गेले होते
हा सर्व दिंडी सोहळा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक एस एल पवार अजिंक्य विद्यालयाचे मुख्याध्यापिका मनीषा माने पवार मुख्याध्यापक लक्ष्मीकांत पवार स्मिता निकम दीपिका सावताडेकर पल्लवी शिरसागर स्वप्नाली सांडसे सोनाली मोळवणे वर्षा उंद्रे स्वाती भारती संध्या कोल्ह भाग्यश्री पवार अनुराधा देशमुख रमेश माने, तानाजी चोथवे यांनी विशेष परिवेशन घेतले