मुख्यकार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या हस्ते
ग्रामविकास अधिकारी बैलकवाड यांचे स्वागत .
उमरी ( प्रतिनिधी ) उमरी तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेल्या तळेगावचे ग्रामविकास अधिकारी बैलकवाड व्ही. जे. यांनी जी. ी. एम. पोर्टलवरुन जिल्हा परिषद कें .द्रीय प्राथमिक शाळा तळेगाव, जिल्हा परिषद शाळा वाल्मिकनगर, अंगणवाडी क्रं. १ ते ५ आणि प्राथमिक आरोग्य उपकेंद्र तळेगाव येथे १५ व्या वित्त आयोग निधीतुन अंदाजे रू. ६,५०,०००/- चे साहित्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल
नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांचे हस्ते त्यांचा उमरी पंचायत समिती सभागृहात सत्कार करुन अभिनंदन करण्यात आले. ह्याप्रसंगी उमरी पं. स. चे गटविकास अधिकारी अरबडवाड, विस्तार अधिकारी मोटरवार, विस्तार अधिकारी पंचायत भुरे आणि सर्व ग्रामसेवक उपस्थित होते. त्या अनुषंगाने माजी नगराध्यक्ष संजय कुलकर्णी यांनी तळेगाव च्या वतिने ग्रामविकास अधिकारी बैलकवाड यांच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले आहे .