देगलूर /प्रतिनीधी
तालुक्यातील प्रतिभावंत, अभ्यासू , खंबीर वक्तव्य असा चेहरा म्हणून ओळख असलेल्या व सामजिक कार्यरत अग्रेसर असलेल्या विशाल पवार यांनी काँग्रेस च्या ध्येय धोरणावर विश्वास ठेऊन तसेच माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार यांच्या मार्गदर्शनाने लोकसभेच्या निवडणुकीदरम्यान काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
लोकसभेच्या निवडणुकीत त्याची पक्षाबद्दल ची निष्ठा व पक्षासाठीचे कार्य पाहून खा. वसंतराव चव्हाण व जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर याच्या मार्गदर्शनाने व माजी नगराध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार तसेच तालुका अध्यक्ष श्वेताताई बस्वराज पाटील यांच्या सूचनेनुसार विशाल पवार यांची काँग्रेस कमिटीच्या तालुका प्रवक्ता म्हणून निवड करण्यात आली आहे.
भारतीय काँग्रेसचे कमिटीचे जिल्हाअध्यक्ष हणमंतराव पाटील बेटमोगरेकर तसेच तालुका अध्यक्ष श्वेताताई पाटील व आदी मान्यवरांच्या हस्ते नुकतेच पवार यांना नियुक्तीपत्र देऊन सन्मानित केले.
भारतीय काँग्रेसच्या वतीने काँग्रेस ची भूमिका मांडण्यासाठी प्रवक्ते पद दिले जाते. उत्कृष्ट सादरीकरण आणि वकृत्व सिद्ध करणाऱ्यांची प्रवक्ता पदांवर निवड केली जाते. पवार यांच्या काही विशेष म्हणजे त्यांचे सखोल अभ्यास, उत्कृष्ट वकृत्व, पत्रकारिता क्षेत्रातील त्यांची लेखणी मध्ये असलेला सफाईदार पणा यामुळे पवार यांना प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली. पवार हे अतिशय चांगले आणि प्रभावीपणे आपले मुद्दे मांडून काँग्रेस ची भूमिका मांडण्यासाठी समर्थ आहेत व भविष्यात राहतील असे जिल्हाध्यक्ष हणमंतराव पाटील यांनी सांगितले.पवार यांच्या या निवडीचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.