तभा फ्लॅश न्यूज/बार्शी : ‘व्हाईस ऑफ मीडिया’ डिजिटल विंगचे प्रदेशाध्यक्ष हर्षद लोहार यांच्यावर मागील महिन्यात बार्शीतील एका खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या उपचारासाठी लागणारा खर्च मोठा असल्याने, हर्षद लोहार त्याचे मित्र, ,सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधवांनी पुढाकार घेऊन आर्थिक मदतीसाठी पुढाकार घेतला होता.
‘व्हाईस ऑफ मीडिया’चे संस्थापक अध्यक्ष संदीपजी.काळे व राज्य उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, ‘व्हाईस ऑफ मीडिया’ बार्शी शाखेचे सदस्य व शहर व तालुक्यातील अनेक पत्रकारांनी आर्थिक मदत गोळा केली. या मदतीतून एकूण २,१५,००० रुपयांची रक्कम जमा करण्यात आली.
ही संपूर्ण रोख रक्कम आज हर्षद लोहार यांच्या आई कडे अधिकृतरित्या सुपूर्द करण्यात आली. या उपक्रमामुळे सामाजिक बांधिलकीचा एक सुंदर आदर्श निर्माण झाला असून, पत्रकाराच्या एकतेचे प्रत्यक्ष उदाहरण पाहायला मिळाले.
या प्रसंगी व्हाईस ऑफ मीडीया राज्याचे उपाध्यक्ष अजित कुंकूलोळ, बार्शी शाखेचे शाम थोरात, विजय शिंगाडे, निलेश झिंगाडे, जमीर शेख,उमेश काळे,मयूर थोरात,समाधान चव्हाण, अमोल आजबे, संदीप आलाट, तात्या माळी, प्रविण पावले, विक्रांत पवार, रामचंद्र ईकारे सह अनेक सहकारी पत्रकार, बांधव उपस्थित होते. लोहार परिवाराने मदतीसाठी मनापासून आभार मानले
Post Views: 18