सोलापूर : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी आपल्याला आणि मुलगी प्रणिती शिंदेंना भाजपने ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. पण त्यांना अशी कोणतीही भाजपकडून ऑफर दिली नाही. पण कुणीही मोदीजींच्या नेतृत्वात भाजपचा दुपट्टा घालण्यास तयार असेल तर भाजपचा दुपट्टा नेहमी तयार आहे. तो कुणीही असू द्या, असं स्पष्टीकरण भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलं.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सोलापूरच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलत असताना सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावर भाष्य केलं.
‘सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत मी जबाबदारीने सांगत आहे. भाजपकडून प्रणिती शिंदे किंवा सुशील कुमार शिंदे यांना अशी भाजपकडून कोणतीही वापर दिली नाही. मीडियाच्या माध्यमातून चुकीच्या बातम्या जात आहेत. भेट होणं ही गोष्ट वेगळी आहे. सुशीलकुमार शिंदे आणि माझी ही दोन-तीन वेळा भेट झाली आहे.. पण ती गोष्ट वेगळी आहे, असं बावनकुळेंनी स्पष्ट केलं.
तसंच, कुणीही मोदीजींच्या नेतृत्वात भाजपचा दुपट्टा घालण्यास तयार असेल. जसे अजित दादा यांनी भाजपला समर्थन देताना सांगितले होते, जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजींच्याच आहे. त्यामुळे शरद पवार यांना सोडून अजितदादा भाजप बरोबर आले. भाजपचा दुपट्टा नेहमी तयार आहे. तो कुणीही असू द्या. मात्र त्यासाठी आम्ही कुठलीही ऑफर देणार नाही आणि कुठल्याही सीट संदर्भात कमिटमेंट देणार नाही. भाजपचे खासदारकी आमदार असे म्हणणार नाही. मोदीजींना साथ देण्यासाठी कोणी येत असेल तर आम्ही त्यांना नाही म्हणणार नाही, असंही बावनकुळे म्हणाले.
आम्ही आता इतके पैके आहोत. आम्हाला दाटीवाटी करून अजून 13-14 लोकांना बसवायचं असेल तर आम्ही गाडीत बसवू पण महाराष्ट्रात चांगलं सरकार आणू ,देश कल्याणाचा, राष्ट्र कल्याणाचा, महाराष्ट्र कल्याणाचा या महाराष्ट्रात आणू. या करता आम्ही सर्व एकत्र आहोत हे त्या ठिकाणी मला सांगायचं आहे, असं म्हणत बावनकुळे यांनी अजितदादांच्या व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली.
तसंच, सोलापुरातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. सर्वसामान्य जनतेला 15000 घरे देण्यासाठी मोदीजी सोलापुरात येत आहेत. सर्वांसाठी हा आनंदाचा क्षण आहे. सोलापुरातील वॉरियर्स बैठक ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागतासाठी करण्यात आली होती, असंही बावनकुळे यांनी सांगितलं.