उपमहानिरीक्षक शहाजी ऊमाप यांचे स्वागत
नवीन नांदेड प्रतिनिधी.
नांदेड परिक्षेत्राचे नूतन पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी ऊमाप यांनी पदभार स्विकारताच असर्जन येथील राज्यपाल पुरस्कार पोलीस पाटील खंडेराव बकाल यांनी स्वागत केले.
नांदेड परिक्षेत्राचे नूतन पोलीस उपमहानिरीक्षक म्हणून शहाजी उमाप यांनी २६ जुलै रोजी पदभार स्विकारला. दरम्यान, राज्यपाल पुरस्कार प्राप्त पोलीस पाटील खंडेराव बकाल यांनी पोलीस उपमहानिरीक्षक उमाप यांची सदिच्छा भेट घेतली तसेच पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. यावेळी गंगाधर थाटे (रहाटी), माधव बोकारे पाटील (सोमेश्वर) यांची उपस्थिती होती.